नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील बाभूळखेडा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी ज्ञानेश्वर औताडे, उपसरपंचपदी नारायण राधकिसन विधाटे यांची निवड केली आहे.
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत बाभूळखेडा ग्रामपंचायतमध्ये एकूण नऊ पैकी पाच जागा गडाख गटाला मिळाल्या. यावेळी झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. एम. ठाकरे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक कैलास इंगळे यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्योती सुहास कडू, सुभद्राबाई तात्याबा कणगरे, अश्विनी उत्तम माळी यांच्यासह सेवा संस्था अध्यक्ष नारायण कडू, माजी सरपंच साहेबराव औताडे, केशवराव विधाटे, माणिकराव विधाटे, जिजाबापू कडू, सुरेश विधाटे, तुकाराम कडू, राजेंद्र विधाटे आदी उपस्थित होते.
---
१८ अश्विनी औताडे, नारायण विधाटे