शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कोपरगावात अटीतटीच्या लढतीत आशुतोष काळेंची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:33 IST

 विधानसभा निवडणुकीत खºया अर्थाने  ‘कांटे की टक्कर’ पाहावयास मिळाली. भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे व आशुतोष काळे यांच्यात अखेरच्या फेरीपर्यंतच्या चुरशीच्या लढाईत आशुतोष काळे यांनी अवघ्या ८२२ मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला.

कोपरगाव विधानसभा निवडणूक विश्लेषण : रोहित टेके । कोपरगाव :  विधानसभा निवडणुकीत ख-या अर्थाने  ‘कांटे की टक्कर’ पाहावयास मिळाली. भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे व आशुतोष काळे यांच्यात अखेरच्या फेरीपर्यंतच्या चुरशीच्या लढाईत आशुतोष काळे यांनी अवघ्या ८२२ मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. कोपरगाव विधानसभा मतदार संघ जो संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा असतो.  पारंपरिक लढत काळे व कोल्हे यांच्यात असते. गेल्या खेपेला स्नेहलता कोल्हे भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. यंदा त्यांचा मुकाबला राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांच्याशी होता. कोपरगाव विधानसभा मतदार संघ गत पाच वर्षापासून रस्ते व पाणी या विषयाभोवती फिरत होता. विद्यमान आमदारांना दोनही प्रश्न पाच वर्षात निकाली काढता आला नसल्याने व काळे यांनी सत्ता नसताना देखील पाणी व रस्त्याच्या प्रश्नांमध्ये रस दाखवत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यामुळे जनतेने भविष्यात काळे दोन्ही प्रश्न निकाली लावतील या आशेने ख-या अर्थाने तिरंगी लढत असून देखील काळे यांना निसटता विजय मिळाला. चुरशीच्या लढाईत मतमोजणीच्या फे-या दरम्यान काळे व कोल्हे यांच्या मताधिक्यात फार कमी फरक राहिला. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या आजवरच्या लढाईत, अशी लढाई पहिल्यांदाच झाली.परजणेंमुळे कोल्हेंचा पराभव ? ४शहरात अपक्ष उमेदवार विजय वहाडणे हे भाजपच्या मतांचे वाटेदार ठरले. तर दुसरे अपक्ष उमेदवार असलेले राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांचादेखील शहरासह ग्रामीण भागात कोल्हे यांची मते खाण्यात मोठा वाटा राहिला. तसेच कोल्हे यांच्यावर स्थानिक पातळीवर असलेली नाराजी इत्यादी कारणामुळे कोल्हे यांचा पराभव तर काळे यांना विजय प्राप्त झाला .शहीद जवानांना विजय समर्पित  माझा विजय हा वीरगती प्राप्त झालेल्या तालुक्यातील दहिगाव बोलका येथील शहीद जवान सुनील वलटे यांना समर्पित करत आहे.  मतदार व कार्यकर्ते यांनी मनापासून काम केले. कोपरगाव तालुक्याचा थांबलेला विकास रथ झपाट्याने पुढे नेऊ. कोपरगाव तालुक्यातील पाण्याचा व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.      

टॅग्स :Ashutosh Kaleआशुतोष काळेAhmednagarअहमदनगर