श्रीरामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन तसेच शेती व्यवसायावरील नैसर्गिक संकटाच्या प्रतिकूल परिस्थितीत अशोक सहकारी बँकेने दोन कोटी ८२ लाख रुपयांचा नफा मिळविल्याची माहिती उपाध्यक्ष किशोर फोफळे यांनी दिली.
बँकेचे संस्थापक माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली प्रगतिपथावर वाटचाल सुरू असल्याचे फोफळे यांनी सांगितले.
बँकेच्या ठेवी ४४२ कोटी २४ लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव तसेच टाळेबंदीचा व्यवहारावर परिणाम झाला. अन्यथा रौप्य महोत्सवी वर्षात ठेवी ५०० कोटी रुपयांवर गेल्या असत्या, असे फोफळे म्हणाले.
बँकेचे सभासद, ठेवीदार व ग्राहकांचा पारदर्शक कारभारावर विश्वास आहे. त्यामुळे राज्यात १३ शाखा कार्यरत आहेत. बँकेने २५३ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. गुंतवणूक १६६ कोटी ९० लाख रुपयांवर गेली आहे. थकीत कर्ज निधीसाठी ५ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आल्याचे फोफळे म्हणाले.
अशोकला आजपर्यंतच्या वाटचालीत तीन वेळा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट बँक पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. पुढील काळात बँकेचा आणखी विस्तार अपेक्षित आहे, असे कार्यकारी अधिकारी प्रदीप थोरात यांनी पत्रकात म्हटले आहे.
-----