शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिमरित्या पिकविलेला साडेचार क्विंटल आंबा केला नष्ट

By admin | Updated: October 30, 2023 11:16 IST

अहमदनगर: आंब्यावरील कृत्रिमचा डाग यंदा तरी पुसण्याची चिन्हे नाहीत़ कृत्रिमरित्या आंबा पिकवून बाजारात विक्रीसाठी आलेल्या आंब्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे.

अहमदनगर: आंब्यावरील कृत्रिमचा डाग यंदा तरी पुसण्याची चिन्हे नाहीत़ कृत्रिमरित्या आंबा पिकवून बाजारात विक्रीसाठी आलेल्या आंब्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे. इतर काही दुकानातील आंब्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत़ या कारवाईमुळे आंब्याच्या बाजारात खळबळ उडाली आहे़ यंदा आंब्याला युरोपात बंदी घालण्यात आली आहे़ कृत्रिमरित्या आंबा पिकविल्याचा ठपका युरोपीय राष्ट्रांनी ठेवला आहे़ परिणामी विदेशात निर्यात झाली नाही़ त्यामुळे आंब्याचे भाव गडगडले आहेत़ उत्पादक शेतकरी अडचणीत तर ग्राहक जाम खूष, अशी बाजारातील स्थिती आहे़ कृत्रिम आंबा पिकविण्याच्या सवयीमुळे उत्पादक आंतराष्ट्रीय बाजारपेठ गमावून बसले आहेत़ असे असले तरी व्यापार्‍यांची कृत्रिम आंबा पिकविण्याची खोड काही केल्या जात नाही़ कृत्रिमरित्या पिकविलेला आंबा सर्रास बाजारात विक्रीसाठी येत आहे़ पांढरी पावडर टाकून पिकविलेला आंबा मार्केयार्डमध्ये विक्रीसाठी आल्याची माहिती येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना खबर्‍यामार्फत मिळाली़ प्राप्त महितीच्या आधारे अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त के ़एस़ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यु़ आऱ कावळे यांच्या पथकाने मार्केट यार्डमधील आंब्याचे व्यापारी बोटमल अमरचंद यांच्या दुकानावर छापा टाकून ४०० किलो आंबा जप्त केला़ आंब्याचे दुसरे व्यापारी सिकंदर रहेमान बागवान यांच्याकडील ६० किलो आंबा जप्त करून नष्ट केला़ आंबा नैसर्गिकरित्या पिकण्यास उशिर लागतो़ आंब्याची एक आढी किमान आठ दिवसांत पिकते़ पिकू घातलेला आंबा आठ दिवसानंतरच बाजारात आणता येतोे़ आठ दिवसांत भावात चढउतार होण्याची भीती असते़ त्यामुळे झटपट आंबा पिकविण्यासाठी व्यापार्‍यांनी कारपेटचा पर्याय शोधून काढला़ हा एक प्रकारचा गॅस आहे़ त्यामुळे आंबा पिकत नाही़ आतून ती कैरीच असते़ फक्त रंग बदलतो़ हिरवी कैरी पिवळी होते़ आतून तो कडक असतो़ त्याला आंब्याची चव नसते़ हा आंबा शरिरास घातक आहे़ त्यामुळे हा आंबा नागरिकांच्या खाण्यात जाणार नाही, याची काळजी प्रशासन घेत आहे. अनेक दुकानातील आंब्याचे नमुने घेण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी) असा पिकतो आंबा आंब्याच्या विविध जातींच्या कैर्‍या विकत आणल्या जातात़ कैर्‍या आणून त्याची आढी लावली जाते़ परंतु हा आंबा पाडाला लागला होता किंवा नाही,हे तपासले जात नाही़ परिणामी तो पिकत नाही़ त्यामुळे कमीवेळेत आंबा पिकविण्यासाठी कारपेट टाकून आंबा पिकविला जातो़ यामुळे आंब्याला पिवळा रंग येतो़ चव येत नाही़ कृत्रिमरित्या पिकविलेल्या आंब्याला चव नसते़ तो पूर्णपणे कडक असतो़ क़ृत्रिमरित्या पिकविलेला आंबा आरोग्यास घातक आहेक़ोणतेही दूषित अन्न पोटात गेल्यास त्याचे अनेक परिणाम होतात़अन्ननलिका, जठरावर त्याचा परिणाम होतो़ विषारी पदार्थाची तीव्रता अधिक असल्यास किडनीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते़ - डॉ़सतीश राजूरकर, आरोग्य अधिकारी, महापालिका शहरात पांढरी पावडर टाकून आंबा पिकविला जात असल्याची माहिती मिळाली़ प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित व्यापार्‍यांच्या दुकानावर छापा टाकला असता पांढरी पावडर टाकून आंबा पिकविल्याचे उघड झाले़ त्यामुळे हा आंबा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे़ - के ़एस़ शिंदे, सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन