-राजश्री घुले, अध्यक्षा, जिल्हा परिषद
------------
शेवगाव तालुक्यात अर्सेनिक अल्बम गोळ्या खराब निघाल्याबाबत कळाले. त्यानंतर तेथील गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देऊन तपासणी करण्याबाबत सांगितले आहे. तपासणीनंतरच खरा प्रकार लक्षात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करू.
-निखिलकुमार ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
------------
वाघोली ग्रामपंचायत पातळीवरून अर्सेनिक अल्बम गोळ्या निकृष्ट असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे तेथील गोळ्या ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवल्या जातील. इतरही ठिकाणी तक्रारी आहेत का याचीही तपासणी वरिष्ठांच्या आदेशानुसार केली जात आहे.
-महेश डोके, गटविकास अधिकारी, शेवगाव
------------
गोळ्या निकृष्ट असल्याचा प्रकार खरा असेल, तर ही फार गंभीर बाब आहे. सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार धक्कादायक असून, त्याची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करावी.
-राजेश परजणे, जि.प. सदस्य