शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा मोरयाचे उत्साहात आगमन; नगरच्या विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 10:22 IST

लाडक्या श्री गणेशाचे आज उत्साहात आगमन झाले. नगर शहरात बाप्पांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण होते. नगरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात आज (२२ आॅगस्ट) सकाळी मानाच्या गणेशाची जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते विधीवत पूजा, अर्चा करुन श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

अहमदनगर : लाडक्या श्री गणेशाचे आज उत्साहात आगमन झाले. नगर शहरात बाप्पांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण होते. नगरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात आज (२२ आॅगस्ट) सकाळी मानाच्या गणेशाची जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते विधीवत पूजा, अर्चा करुन श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करुन हा सोहळा पार पडला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, पंडिरतराव खरपुडे, अशोक कानडे यांच्यासह पदाधिकारी, भाविक उपस्थित होते. यंदा नगरमधील गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल गणेश मंदिरात यंदा भाविकांंना प्रत्यक्ष दर्शन मिळणार नाही. परंतु दहा दिवस मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम, आरती सोशल मीडियातून थेट पाहता येईल, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साधेपणाने साजरा करावा. सोशल डिस्टन्सचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, गर्दी टाळावी असे आवाहन यावेळी पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी केले. 

दरम्यान, आज घरोघरी गणेशाच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण होते. गणेश मूर्तीचे घरोघरी पूजनाचे कार्यक्रम सुरू होते. बालगोपालांसह सर्वांचा उत्साह होता. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024