सोनई : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत, सेवा संस्थेच्या भानसहिवरे (ता. नेवासा) येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, आकाश गडाख, जयेश दरंदले, निखिल दरंदले या कृषिदूतांचे बेल्हेकरवाडी येथे आगमन झाले.
यावेळी सरपंच कानिफनाथ येळवंडे, युवा शेतकरी सिद्धार्थ बेल्हेकर, गहिनीनाथ धाबर, कुलदीप शिंदे, अनिल वने, अभिषेक शिंदे, सुनील बेल्हेकर व ग्रामस्थांच्या वतीने कृषिदूतांचे स्वागत करण्यात आले.
कृषिदूत हे अंतिम वर्षातील विद्यार्थी असून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत भानसहिवरा कॉलेजचे प्राचार्य डॉ. अतुल दरदंले, कार्यक्रम समन्वयक प्रा. मनोज माने, कार्यक्रम अधिकारी सी. के. गाजरे आदी शिक्षकवृंदांच्या मार्गदर्शनाखाली गावातील पीक लागवड शेती पद्धती, बळीराजाला वित्तीय पुरवठा करणाऱ्या सहकारी वित्त संस्थांची कार्यपद्धती, पीक प्रात्यक्षिके तसेच इतर शेती संबंधी माहिती गोळा करणार असून शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषिदूतांमध्ये आकाश गडाख, जयेश दरंदले, निखिल दरंदले यांचा समावेश आहे.
---
१८सोनई