श्रीरामपूर : बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये सोमवारी ८ जून रोजी २२ हजार कांदा गोणींची आवक होती. कांद्याच्या भावामध्ये दोन दिवसांपूर्वीच्या भावापेक्षा १०० ते १२५ रुपये प्रतिक्विंटल प्रत्येक श्रेणीत वाढ आहे. लिलावामध्ये प्रथम श्रेणीचा कांदा १६०० ते २२००, द्वितीय १००० ते १६००, तृतीय ४५० ते ९०० व गोल्टी कांदा ८५० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल विकला गेला. विक्रीनंतर कांदा खरेदी व्यापाऱ्यांनी खरेदीचा कांदा आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आदी राज्यात पाठवला. या राज्यातून कांद्यास ग्राहकी चांगली आहे. श्रीरामपूर कांदा मार्केटमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार व गुरुवार या चार दिवस लिलाव होणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उत्पादित कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती संगीता शिंदे, उपसभापती नितीन भागडे व सचिव किशोर काळे यांनी केले आहे.....................
शिवस्वराज्य दिन साजरा
श्रीरामपूर : तालुक्यातील भामाठाण या गावी ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये शिवस्वराज्य दिन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. पूजनाचा मान लेविन भोसले सर यांना देण्यात आला.
याप्रसंगी उपसरपंच दिनकरराव बनसोडे, पोलीसपाटील मधुकर बनसोडे, सेवा संस्थाध्यक्ष रामनाथ सांगळे, किशोर बनसोडे, शिवनाथ आव्हाड यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोहळ्यास संदीप बनसोडे उपस्थित होते.
----------
शिवस्वराज्य दिन उत्साहात
श्रीरामपूर : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक उत्सव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यकर्ते व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून वंदन केले. या उत्सवाचे औचित्य साधून कोरोना कालावधीत सेवा कार्य करणाऱ्या विविध मंड़ळांच्या कामाचे कौतुक करून एक हात मदतीचा ग्रुप, नवोदय युवा प्रतिष्ठान, प्रेण्डस् ग्रुप, सतीश पाटणी, रुग्णवाहिका चालक श्याम भाऊ व खैरी निमगावचे आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड आदिंना कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजपाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष पुष्पलता हरदास, राज्य नेते प्रकाश चित्ते, संजय पांडे, बाळासाहेब हरदास, किरणताई सोनवणे, गणेश भिसे व कार्यकर्ते उपस्थित होते.
...
-------