शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

अहमदनगर जिल्ह्यातील तेराशे गुन्हेगार पोलिसांच्या नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 13:47 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यात गुन्हेगार दत्तक योजना कार्यान्वित करण्यात आली असून, १ हजार ३५३ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व गुन्हेगारांच्या हालचालींवर आता पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. 

अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यात गुन्हेगार दत्तक योजना कार्यान्वित करण्यात आली असून, १ हजार ३५३ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व गुन्हेगारांच्या हालचालींवर आता पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. जिल्ह्यातील भुरटे, सराईत आणि कुख्यात गुन्हेगारांची पोलीस ठाणेनिहाय अधिकारी, कर्मचा-यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा आणि गुन्हेगारीच्या घटनांत संवेदनशील जिल्हा म्हणून नगरची राज्यात ओळख आहे. विविध गुन्ह्यांत रेकॉर्डवर आलेले, शिक्षा भोगून आलेले, तर जामिनावर सुटलेले गुन्हेगार पुन्हा गुन्हे करण्यात सक्रिय होतात. जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसावा, या उद्देशातून गुन्हेगारी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत जिल्ह्यातील आणि बाहेरून येऊन गुन्हे करणा-यांचाही समावेश करण्यात आलेला आहे.स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील ३० पोलीस ठाण्यांतील ६१९ पोलीस अधिकारी, कर्मचा-यांवर या गुन्हेगारांची जबाबदारी देण्यात आली आहे. नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, कॅम्प या तीन पोलिस स्टेशनमधील ६० गुन्हेगार दत्तक घेतले असून, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुकुंदनगर परिसरातील एका कुख्यात टोळीतील सदस्यांवर पोलिसांची बारीक नजर राहणार आहे.

या गुन्हेगारांचा समावेश

दुचाकी, चारचाकी वाहने चोरणा-या टोळ्या, चैनस्रॅचिंग करणारे, दरोडेखोर, रस्तालूट करणारे, मारहाण, खून, दरोडे टाकणारे यासह कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचविणा-या गुन्हेगारांचा या योजनेत समावेश आहे.

काय करणार पोलीस

ज्या गुन्हेगारांची संबंधित पोलीस अधिका-याकडे जबाबदारी आहे, तो अधिकारी गुन्हेगाराच्या हालचालींवर लक्ष्य ठेवणे, त्याच्या घरी अचानक भेट देणे, त्याला पोलीस ठाण्यात हजेरीसाठी बोलविणे, त्याच्या संपर्कात इतर कोणी गुन्हेगार आहेत का, याकडे लक्ष्य ठेवणे, त्या गुन्हेगाराने काही गुन्हा केला तर तत्काळ त्याला अटक करणे, अशी जबाबदारी आहे.

एलसीबीकडे सराईत गुन्हेगार

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह या शाखेतील ४२ अधिकारी, कर्मचा-यांकडे २१२ गुन्हेगारांची जबाबदारी आहे. पवार यांच्याकडे चाच्या पाच्या भोसले, अजहर मंजूर शेख, पवन युनूस काळे, रघुल दशरथ काळे, रमेश छगन भोसले यांची जबाबदारी आहे.

पोलीस स्टेशननिहाय दत्तक गुन्हेगार

कोतवाली - २०, तोफखाना - २०, कॅम्प - २०, एमआयडीसी - १५, नगर तालुका - ३०, सुपा - २०, पारनेर - १२८, बेलवंडी - १९, श्रीगोंदा - २०, कर्जत - २०, जामखेड - ११, पाथर्डी - २६, शेवगाव - ३१, नेवासा - २२, सोनई - ३२, शनिशिंगणापूर - ३२, श्रीरामपूर शहर - ५०, श्रीरामपूर तालुका - १११, राहुरी - २०, राहाता - २१, लोणी - १५, शिर्डी - २५, कोपरगाव शहर - ८५, कोपरगाव तालुका - १५, संगमनेर शहर - २०५, संगमनेर तालुका - ७५, घारगाव - १५, आश्वी - २२, अकोले - १४, राजूर - १५, स्थानिक गुन्हे शाखा - २१२.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस