याबाबत शिवसैनिकांनी शुक्रवारी मुंबई येथे राऊत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, श्याम नळकांडे, दीपक खैरे, संग्राम कोतकर आदी उपस्थित होते. ७ एप्रिल २०१८ रोजी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन वर्ष उलटून गेले तरी या खटल्याचे प्रोसिडिंग झालेले नाही. या गुन्ह्यातील काही आरोपींना जामीन मिळालेला आहे. गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झालेले आहे. मात्र गुन्ह्यातील आरोपी सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकर तसेच इतर आरोपी फरार आहेत. फरार आरोपींना तातडीने अटक करून या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी असे याप्रकरणी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी राऊत यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन शिवसैनिकांना दिले.
सुवर्णा कोतकरला अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST