शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरहून पंढरपूर यात्रेसाठी २३५ जादा बसची व्यवस्था

By चंद्रकांत शेळके | Updated: June 23, 2023 19:22 IST

आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठी यंदा नगर विभागातर्फे २३५ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे.

अहमदनगर: आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठी यंदा नगर विभागातर्फे २३५ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. दि. २५ जून ते ३ जुलै या कालावधीत या सर्व बस तारकपूर स्थानकातून सुटणार आहेत. यंदा २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची सोय म्हणून दरवर्षी एसटी महामंडळातर्फे जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. यंदाही अहमदनगर विभागाच्या वतीने २३५ जादा गाड्यांचे नियोजन झालेले आहे.

पंढरपूर यात्रेमुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचे आर्थिक उत्पन्न मिळत असते. परंतु, मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्षांत पंढरपूरची यात्रा झाली नाही. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले. मागील वर्षीही नगर विभागातून ३०० जादा बस पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या होत्या. नगर शहरातील तारकपूर बसस्थानकातून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष बससेवा उपलब्ध असेल. २५ जून ते ४ जुलैपर्यंत जादा गाड्या तारकपूरहून पंढरपूरकडे रवाना होतील. पंढरपूर येथे विठ्ठल कारखाना यात्रा केंद्रावर तात्पुरत्या स्थानकाची व्यवस्था केली असून तेथून परतीच्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ७५ पेक्षा जास्त वयाच्या भक्तांना मोफत प्रवासशासनाने ७५ पेक्षा जास्त वयाच्या भक्तांना मोफत प्रवासाची सोय केली आहे. हीच सोय पंढरपूर यात्रेसाठीही असल्यामुळे या भाविकांना मोफत पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे. याशिवाय महिलांना तिकिटात ५० टक्के सूट असेल. ... तर थेट गावातही येईल बसजिल्ह्यातील ग्रामीण भागातून ४५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पंढरपूरला जाण्यास इच्छुक असल्यास थेट गावातून स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येईल. या स्वतंत्र बसकरिता नजीकच्या आगारास संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन एसटीतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर