शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'लोकमत'च्या अपर्णा वेलणकर यांना 'दीनमित्र'कार पत्रकारिता पुरस्कार प्रदान

By सुदाम देशमुख | Updated: December 24, 2023 19:12 IST

सत्यशोधक चळवळीमध्ये 'दीनमित्र' या पत्राची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन यावेळी राजेंद्र दर्डा यांनी केले.

अहमदनगर : सत्यशोधक पत्रकार 'दीनमित्र' कार मुकुंदराव पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यावर्षीचा पत्रकारिता पुरस्कार नाशिक येथील ‘लोकमत’च्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलणकर यांना माजी मंत्री व 'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते आज तरवडी (ता. नेवासा) येथे प्रदान करण्यात आला.

मुकुंदराव पाटील यांनी सत्यशोधक विचाराचा प्रसार करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी येथून ५८ वर्ष ' दीनमित्र' हे नियतकालिक चालविले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सत्यशोधकी विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या पत्रकार व साहित्यिकांना पुरस्कार प्रदान केले जातात.  यावर्षीच्या समारंभाला राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार नरेंद्र घुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, सचिव उत्तमराव पाटील, उपाध्यक्ष कॉ. बाबा आरगडे, साहेबराव घाडगे,  ॲड. देसाई देशमुख यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी वसंत गायकवाड, प्रा. प्रशांत गायकवाड, ललित अधाने, डॉ. हंसराज जाधव, राहुल हांडे, सत्यजित पाटील, सुनील गोसावी, डॉ. राजेंद्र गवळी यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

तरवडीसारख्या खेडेगावातून मुकुंदराव पाटील यांनी सत्यशोधक विचार तेवत ठेवला. ही खूप मोठी गोष्ट आहे. सत्यशोधक चळवळीमध्ये 'दीनमित्र' या पत्राची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन यावेळी राजेंद्र दर्डा यांनी केले. अपर्णा वेलणकर म्हणाल्या, कुठल्याही साधनाशिवाय ग्रामीण भागातील प्रश्न कसे समजावून घेतले जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण मुकुंदराव पाटील यांनी आपल्या पत्रकारितेतून घालून दिले आहे. त्यामुळे नव्या पिढीतील पत्रकारांनी खुर्च्या सोडून रस्त्यावर व माणसात जाण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर