शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरमध्ये सशस्त्र दरोडा; एकाचा पाय तोडला, चार जखमी, तीन लाखाचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:20 IST

आनंद हा लघुशंकेसाठी पहाटेच्या सुमारास घराबाहेर आला असता दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी त्याचा पाठलाग करुन घरात प्रवेश केला. आनंद याला गज व दांडक्याने मारहाण करीत त्याच्या पायावर कु-हाडीने घाव घातला. यात त्याचा पाय तुटला.

पारनेर : पारनेर तालुक्यातील म्हसे येथील मदगे वस्तीवर सहाजणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. या दरोड्यात दरोडेखोरांनी कु-हाडीने एकाचा पाय तोडला तर चार जणांचा जबर मारहाण केली तसेच तीन लाखाचा ऐवज लांबविला.बुधवारी (दि़ २५) पहाटे म्हसे येथील मदगे वस्तीवरील गणपत लक्ष्मण मदगे यांचे कुटुंबिय नेहमीप्रमाणे घरात झोपलेले होते. गणपत मदगे यांचा मुलगा आनंद हा लघुशंकेसाठी पहाटेच्या सुमारास घराबाहेर आला असता दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी त्याचा पाठलाग करुन घरात प्रवेश केला. आनंद याला गज व दांडक्याने मारहाण करीत त्याच्या पायावर कु-हाडीने घाव घातला. यात त्याचा पाय तुटला. त्याचवेळी दरोडेखोरानी शेजारच्या खोलीला बाहेरुन कडी लावली. त्यामुळे घरातील इतरांना घराबाहेर येता आले नाही. आनंदला मारहाण करुन त्याच्याकडून घरातील पन्नास हजार रुपये व गळ्यातील चैन काढून घेतली. आनंदकडून ऐवज काढून घेतल्यानंतर दरोडेखोरांनी शेजारच्या खोलीची बाहेरची कडी काढत गणपत मदगे यांना व त्यांची पत्नी, मुलगा या तिघांनाही मारहाण केली. तसेच यावेळी दरोडेखोरांनी विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. आरडाओरडा केल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली. पासष्ट वर्षाच्या वृद्धेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे दागिने ओरबाडत बेदम मारहाण केली. मरणाच्या भीतीने घरातील सगळे गप्प बसले. त्यानंतर दरोडेखोरांनी घराबाहेर येत ओट्यावर मद्यप्राशन केले आणि पुन्हा घरात घुसून घरातील जेवणावर ताव मारला. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथूनच काही अंतरावर असलेल्या रमेश कोरेकर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. कोरेकर यांच्या घरातील शेखर कोरेकर, त्यांच्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या सुमन चौधरी यांनाही मारहाण केली. तसेच चार तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटले. दोन वर्षांच्या चिमुकलीच्या कानातील दागिने कात्रीने कापून घेतले. सुमारे दोन तास मदगे वस्तीवर दरोडेखोरांचे हे थरारनाट्य सुरु होते. दरम्यान ही माहिती पोलिसांना समजली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत दरोडेखोरांनी तेथून धूम ठोकली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर