श्रीगोंदा : पोल्ट्रीचा वास व टेपचा मोठा आवाज या कारणावरुन चिंभळेत शिरवळे व अडागळे यांच्या गटात तलवारी, काठ्याने जबर हाणामारी झाली. या हाणामारीत ९ जण गंभीर जखमी झाले असून, बेलवंडी पोलिसांनी १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या हाणामारीत अडागळे गटाचे सुधीर विठ्ठल अडागळे, नितीन अडागळे, सचिन अडागळे, शोभा अडागळे, ज्योती अडागळे तर शिरवळे गटाचे सुरजित बन्सी शिरवळे, अजित बन्सी शिरवळे, रणजित बन्सी शिरवळे, अंजना शिरवळे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.सुरजित शिरवळे, रणजित शिरवळे, अजित शिरवळे, अंजना शिरवळे, बाळू काळे, बन्सी शिरवळे, सुधीर अडागळे, सचिन अडागळे, नितीन अडागळे, मनोज अडागळे, रमेश अडागळे, बाळू अडागळे, संजय अडागळे, सुधीर अडागळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत़ मारामारीनंतर चिंभळेत तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे यांनी भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)
दोन गटात सशस्त्र हाणामारी
By admin | Updated: July 4, 2014 01:21 IST