आयुषी हिच्या यशाबद्दल ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी तिचे कौतुक केले आहे. तिच्या यशाचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘हमारी छोरियां भी छोरोसे कम नहीं’, असे ट्वीट करत अभिनंदन केले. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे आदींनीही तिचे कौतुक केले.
.....
दररोज आठ- दहा तासांची मेहनत
करिअरचे बरेचसे पर्याय माझ्यासमोर होते. बेंगलोर येथे नोकरी करीत असताना संरक्षण खात्यातील माझ्या काही मित्रांमुळे मला हे करिअर करावे वाटले. कर्नल गोखले यांची मला मदत झाली, असे आयुषी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाली. आयुषीने अत्यंत मेहनत घेतली. नोकरी करताना रात्री दररोज आठ-दहा तास तिने अभ्यास करून ध्येय गाठले, असे तिच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.