अहमदनगर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा व्हावा, यासाठी जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा राज्यातील ३४ जिल्ह्यात नेण्यात आली. सुमारे ८५ दिवस जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादहून ही यात्रा नगरला आल्यानंतर यात्रेचे अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कै. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नंदिनी जाधव (पुणे), अॅड. रंजना गवांदे, भगवान रणदिवे(सातारा), संजय जोशी, अर्जुन हरेल, विनायक सापा, रवींद्र सातपुते, बाबा कदम यांनी विविध प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांमध्ये जागृती केली. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले, सल्लागार अशोक बाबर, कॉ. बाबा आरगडे आदींसह हमाल, मापाडी बांधव व महिला उपस्थित होत्या.
जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी आवश्यक
By admin | Updated: May 29, 2024 12:21 IST