शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात चारा छावणीचा दुसरा बळी! खांडके येथे शेतकर्‍याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 14:54 IST

नगर तालुक्यातील खांडके येथील शेतकरी लक्ष्मण संपत गाडे (वय ३५) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

केडगाव - नगर तालुक्यातील खांडके येथील शेतकरी लक्ष्मण संपत गाडे (वय ३५) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. दुष्काळी परिस्थितीत शासनाने सुरू केलेल्या चारा छावण्या व ,पाण्याचे टँकर बंद केल्याने निराश होवून  लक्ष्मण गाडे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप खांडकेचे उपसरपंच पोपट चेटे यांनी केला आहे. याच कारणातून ४ ऑगस्ट रोजी घोसपुरी येथील शेतकर्‍यानेही आत्महत्या केली होती. या प्रकारामुळे शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी नगर पाथर्डी महामार्गावर कौडगावध्ये रास्तारोको करण्यात आला. शेतकर्‍यांच्या आत्महत्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकसत मृत्यूची नोंद झाली आहे.पावसाळा सुरू होवून दोन महिण्यानंतरही नगर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती कायम आहे. शेतात पीक नाही, जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही. अशा परिस्थितीत शासनाकडून सुरू असलेल्या चारा छावण्या व पाण्याचे टँकर बंद केल्याने जनावरे जगवायची कशी? या चिंतेने निराश झालेल्या खांडके येथील लक्ष्मण संपत गाडे या शेतकर्‍याने गळफास घेवून आत्हत्या केली. आत्महहत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. चारा छावण्या व पाण्याचे टँकर प्रशासनाने बंद केल्याने निराश होवून लक्ष्ण गाडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप उपसरपंच चेटे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.यत लक्ष्णण गाडे यांच्या पश्‍चात आई- वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.प्रशासनाच्या या धाकटशाही विरोधात ग्रामस्थांधून संताप व्यक्त होत असून मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार व सोमवारी जिल्ह्यात येत असून यावेळी मुख्यंमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

शेतकर्‍याला न्याय ळिवून देवू - संदेश कार्लेगेल्या पंधरा दिवसापूर्वीही तालुक्यात अशीच घटना घडली होती. मात्र, त्या शेतकर्‍याला प्रशासनाकडून अद्यापही मदत मिळाली नाही. आता पुन्हा तालुक्यात अशी घटना घडल्याने शेतकर्‍यामधून संताप व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहुन न्याय मिळवून देवू, असे जि. प. सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय