शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

पंतप्रधान झाल्यावर भ्रष्टाचारमुक्त-दारुमुक्त भारत घडवणार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘लोकमत’च्या बालचमूला विशेष मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 07:54 IST

अण्णा तुम्ही जर पंतप्रधान झाले तर पहिल्यांदा काय करणार, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एका चिमुकलीने विचारला.

अहमदनगर : अण्णा तुम्ही जर पंतप्रधान झाले तर पहिल्यांदा काय करणार, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एका चिमुकलीने विचारला. त्यावर अण्णांनाही हसू फुटले आणि ते म्हणाले, एक तर मी पंतप्रधान होणार नाही़ फकीर माणूस पंतप्रधान कसा होईल. जर झालोच पंतप्रधान तर पहिल्यांदा मी भारत भ्रष्टाचारमुक्त करीन. बालदिनानिमित्त ‘लोकमत’ने शालेय विद्यार्थ्यांना एक दिवसाचे पत्रकार बनण्याची संधी दिली़ ‘लोकमत’चे भावी महापत्रकार या उपक्रमात जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक तरुणांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मुलाखत विविध प्रश्नांवर अण्णांना बोलते केले़ अण्णांनी या चिमुकल्या पत्रकारांचा आदर राखीत सर्व प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली.

एका मुलीने अण्णांना थेट पंतप्रधान झाल्यावर तुम्ही काय करणार, असा सवाल केला. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, जर मी पंतप्रधान झालोच तर भारत भ्रष्टाचारमुक्त करण्याचा पहिला निर्णय घेईल. दुसरा निर्णय दारु बंदीचा घेईन. पण एकाही पुढा-याला हे आवडणार नाही़त्यानंतर अण्णा हजारे यांनी एक-एका प्रश्नाचे उत्तर देत त्यांच्या लहानपणापासून ते सैन्यातील जीवन आणि त्यानंतरचे सामाजिक जीवन असा सारा पट या विद्यार्थ्यांसमोर उलगडला.

प्रश्न- अण्णा, तुमचे बालपण कसे गेले?अण्णा- मी एका गरीब कुटुंबात जन्माला आलो. सुरवातीला कुटुंबाची परिस्थिती चांगली होती. पुढे पुढे आई-वडिलांनी फॅमिली प्लॅनिंगचा विचार केला नाही. कुटुंबातील संख्या वाढत गेली आणि आवक कमी होत गेली. घरातील आर्थिक परिस्थिती खालावली. लहान वयात खेळायचा शौक होता. विटीदांडू, हुतूतू, कबड्डी असे खेळ खेळायचो. शाळेतून आल्यानंतर दप्तर घरात ठेवले की खेळायला जायचो. अभ्यासापेक्षा खेळण्याकडे जास्त लक्ष असायचे. असे असले तरी वर्गात पहिला नंबर यायचा. बुद्धिमत्ता चांगली होती.

बालपणी कोणत्या व्यक्तींचा प्रभाव राहिला?अण्णा- आईचे संस्कार होते. स्वामी विवेकानंद यांचा मोठा प्रभाव राहिला. मनुष्य जीवन कशासाठी आहे, याचा एकदा विचार करीत होतो. लोकं पळत आहेत. आणखी थोड... आणखी थोडं... असे पळतच राहतात. चौघांच्या खांद्यावर जाईपर्यंत थांबत नाहीत. जन्माला येताना काही आणत नाही आणि जाताना काही नेत नाही. तरीही तो पळतो का? याचे उत्तर मिळाले नाही म्हणून आत्महत्या करण्यासाठी निघालो. मात्र स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक हाती पडले आणि जीवन कळाले. जीवनात एकदाच खोटे बोललो, याला मी आयुष्यात विसरलेलो नाही. आईचं मन मुलांनी जपलं पाहिजे. कबुतरं पाळण्याचा छंद होता. कुठेतरी त्यांना दूर सोडायचो. पतंग उडवायचो. दुसºयांचे पतंग कापले की आनंद व्हायचा. मांजा तयार करायचो. सोड्याच्या बाटल्या कुटून चांगला मांजा तयार करायचो आणि दुसºयाचे पतंग कापायचो. अशा अनेक बालपणीच्या आठवणी आहेत.

प्रश्न- सैन्यातील अनुभव कसे होते?उत्तर- १९६३ मध्ये लष्करात भरती सुरू झाली, त्यात मी एक होतो. औरंगाबादला प्रशिक्षण झाले. सुरक्षेसाठी देशाच्या विविध भागात काम केले. देशाच्या रक्षणासाठी हिमालयात राहिलो. सात वर्षे बर्फात राहिलो. १९६५ ला भारत-पाकिस्तानचे युद्ध झाले. आमच्यावर हवाई हल्ले झाले. माझे सर्व सहकारी शहीद झाले, मी एकटा वाचलो. पुनर्जन्म झाला. नवीन जन्म झाल्याने देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न-उपोषण कसे जमते? झोपडपट्टीतील मुलांसाठी सरकारने काय केले पाहिजे?अण्णा- शरीराला सवय लावली पाहिजे. दिवसातून चार वेळा जेवणाराला उपोषण जमणार नाही. इंद्रियांना जशी सवय लावाल, तसे वळतात. १६-१६ दिवस सोळावेळा उपोषणे झाली. आताही दिल्लीत फेब्रुवारीत उपोषण आहे.शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे. सरकार मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवत असेल तर अशा सरकारविरुद्ध दावा ठोकला पाहिजे. कोणी हक्क मोडीत काढत असेल तर त्यांच्याविरुद्ध लढा दिला पाहिजे.