शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

अण्णांनाही भावला शरद पवारांचा प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 06:18 IST

पवारांनी विरोध जीवंत ठेवला; जनतेने सत्ताधाऱ्यांसह माकडउड्या मारणाऱ्यांना धडा शिकविला

- सुधीर लंके अहमदनगर : शरद पवार यांचे व माझे वैचारिक मतभेद आहेत. मात्र, असे असले तरी या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जे काम केले ते आपणालाही भावले आहे. ध्येयाने प्रेरित होऊन झपाटल्यासारखा त्यांनी भर पावसात प्रचार करत पक्षाला जीवदान दिले व विरोध जीवंत ठेवला, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत पवारांचे कौतुक केले आहे. पक्ष बदलणाऱ्यांना हजारे यांनी उड्या मारणाºया माकडांची उपमा दिली आहे.

विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हजारे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निकालावर भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात जो निकाल हाती आला तो सदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकांनी पक्षांतर करुन माकडउड्या मारल्या. इकडून तिकडे गेले. वैयक्तिक अडचणीत आले किंवा एखादा पक्ष अडचणीत आहे, म्हणून त्याला सोडून सोयीच्या पक्षात जायचे हे योग्य नाही. हे सर्व स्वार्थी राजकारण आहे. मात्र, मतदारांनी अशा माकडउड्या मारणाºयांपैकी १७ उमेदवारांना घरी बसविले आहे.

माझ्यादृष्टीने या निवडणुकीतील ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. लोकशाहीच्या वाढीसाठी मतदारांनी असे करणे गरजेचे होते. अण्णा म्हणाले, पवार व माझ्यात मतभेद आहेत. अर्थात हे मतभेद समाजाच्या हितासाठीच आहेत. मी त्यांच्या मंत्र्यांबाबतही अनेकदा तक्रार केली. मात्र, पवारांनी यावेळी ज्या पद्धतीने प्रचार केला तो तरुणांनाही लाजविणारा आहे. आपला पक्ष रसातळाला चालला आहे. हे पाहून या वयात ते राज्यभर फिरले.

पक्षाला त्यांनी अडचणीतून बाहेर काढले. त्यांच्या प्रचाराचा त्यांचा मित्र असलेल्या काँग्रेसलाही फायदा झाला. अन्यथा हे पक्ष आता संपतील की काय असा धोका निर्माण झाला होता. या पक्षांना भविष्य दिसत नव्हते. विरोधामुळे लोकशाही जीवंत राहते. त्यामुळे सत्ताधाºयांना विरोध हा असायलाच हवा. पवारांनी विरोध कायम ठेऊन जनतेला जागे करण्याचे काम केले आहे. ध्येयाने पछाडलेले असे राज्यकर्तेच लोकशाही मजबूत करु शकतात, अशा भावना त्यांनी बोलून दाखविल्या.

चांगल्याला चांगले म्हटले पाहिजे अशी पुस्तीही त्यांनी आपल्या वक्तव्याला जोडली. निवडणुकीचा एकूण जो प्रचार झाला तो बरोबर नव्हता. त्यात वैयक्तिक हेव्यादाव्यांचीच चर्चा अधिक होती. प्रचारात हे घडणे अपेक्षित नाही. विकासावरती चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले.

जाहीरनामे न पाळल्यास पदे बरखास्त करा

नेत्यांची पक्षांतरे थांबविण्यासाठी बॅलेटवर ‘नोटा’ ऐवजी ‘वरील एकही उमेदवार पसंत नाही’ असे लिहायला हवे. त्यासाठी स्वतंत्र चिन्ह हवे. उमेदवारांपेक्षा या चिन्हाला जास्त मते पडली तर फेरनिवडणूक घ्यायला हवी. ज्या उमेदवारांना नाकारले. त्यांना पुन्हा उभे राहण्याची संधीच द्यायला नको. यातून गुंड, व्याभिचारी लोकांंना पक्ष तिकीटच देणार नाहीत. तसेच उमेदवार व पक्ष जे जाहीरनामे काढतात ते न पाळल्यास त्यांना बरखास्त करण्याची तरतूद हवी. म्हणजे उगाचच कोणतीही आश्वासने देऊन दिशाभूल केली जाणार नाही, असेही हजारे म्हणाले.

सत्ताधाऱ्यांना अहं नडला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करत असले तरी त्यांचे मंत्री, कार्यकर्ते यांचा जनतेशी संपर्क तुटला होता. त्यांच्यात अहं निर्माण झाला होता. आम्हाला कोणी हरवू शकत नाही. आमच्यासारखे आम्हीच, अशी त्यांची भावना झाली होती. विरोधी पक्ष रसातळाला गेला आहे, असा भास निर्माण करण्यात आला होता. या सर्व गोष्टींमुळे भाजप-सेनेच्या जागा घटल्या. आता निकालातून त्यांना धडा मिळेल. यापुढे ते जपून वागतील. मतदार राजा जागा झाला तर काय करतो हे सत्ताधाºयांनाही समजेल. शरद पवारांनी परिवर्तन आणल्यामुळे राज्यकर्ते आता जागे होतील, असे त्यांनी सांगितले.

अण्णा म्हणाले...

पवार व माझ्यात मतभेद आहेत. अर्थात हे मतभेद समाजाच्या हितासाठीच आहेत. मी त्यांच्या मंत्र्यांबाबतही अनेकदा तक्रार केली. मात्र, पवारांनी यावेळी ज्या पद्धतीने प्रचार केला तो तरुणांनाही लाजविणारा आहे. आपला पक्ष रसातळाला चालला आहे. हे पाहून या वयात ते राज्यभर फिरले.

 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019