शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

संघाशी नाव जोडणा-यांविरुद्ध खटला दाखल करणार - अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:50 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जाणीवपूर्वक आपले नाव जोडून बदनामीचा प्रयत्न सध्या माध्यमांमधून सुरू असल्याचा आरोप केला आहे. अशी बदनामी करणा-यांविरूद्ध न्यायालयात बदनामीचे खटले दाखल करणार असल्याचा इशारा हजारे यांनी दिला.

राळेगणसिद्धी : सातत्याने होणारी बदनामी किंवा अपमान पचविल्यामुळे जर समाजाचे, राज्याचे व देशाचे नुकसान होणार असेल तर असा अपमान पचविणे दोष ठरेल, अशी माझी धारणा आहे. खटाशी खट, धटाशी धट व उद्धटाशी उद्धट झालेच पाहिजे, अशा संत पंक्तींचा हवाला देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जाणीवपूर्वक आपले नाव जोडून बदनामीचा प्रयत्न सध्या माध्यमांमधून सुरू असल्याचा आरोप केला आहे. अशी बदनामी करणा-यांविरूद्ध न्यायालयात बदनामीचे खटले दाखल करणार असल्याचा इशारा हजारे यांनी गुरूवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.या पत्रकात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, दिल्ली येथील आंदोलनात सहभागी कल्पना इनामदार या नथूराम गोडसे यांची नात असल्याच्या व त्यांच्याहाती या आंदोलनाची सर्व सूत्रे अण्णांनी सोपविल्याच्या बातम्या येत आहेत. वास्तविक त्यांचा व माझा पूर्वी कधी परिचय नव्हता. आंदोलनासाठी विविध राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांपैकी इनामदार एक होत्या. त्यांच्याकडे आंदोलनाची कोणतीही सूत्रे सोपविलेली नव्हती. कार्यकर्त्यांनी आंदोलनाची कामे विभागून घेतली. त्यानुसार इनामदार यांनी मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी घेतली होती. आंदोलनाची सर्व सूत्रे मी स्वत: हाताळली. इनामदार यांना आंदोलनाचे मुख्य सूत्रधार करून माझा संघाशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. किती खोटे बोलावे याचे सुद्धा बदनामी करणा-या चौकडीला भानच राहिलेले नाही.माजी मंत्री नबाब मलिक यांनी एका चॅनेलवर चक्क खोटा आरोप करताना अण्णांनी संघाच्या शाखेत दहा वर्षे प्रशिक्षण घेऊन त्यानंतर सामाजिक काम सुरू केल्याचे सांगितले. विशिष्ट वर्गाकडून माझे नाव संघाशी जोडण्याचा प्रयत्न करून काही मंडळी मला व आंदोलनास जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे रॅकेट चालवित आहेत. गेली २५ वर्षे राष्ट्रहितासाठी कोणत्याही पक्षाचा, व्यक्तीचा विचार न करता मी आंदोलने करीत आलो. आमच्या आंदोलनामुळे विविध पक्षांच्या मंत्र्यांना घरी जावे लागले. त्यामुळे त्या त्या पक्षांची मोठा हानी झाली. पण स्वत: भ्रष्ट असल्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत. आंदोलनामुळे राजकीय पक्षांची ‘धरले तर चावते अन् सोडले तर पळते’ अशी अवस्था झाली आहे, अशी टीकाही हजारे यांनी केली.

मी गेली २५ वर्षे समाज, राज्य आणि राष्ट्रहितासाठी कोणत्याही पक्ष, पार्टी व व्यक्तिचा विचार न करता आंदोलने करीत आलो. दुकानातील रेडिमेड कपडे कुणाला ना कुणाला येतच असतात. पण त्यांना असे वाटते की, हे आमच्यासाठीच शिवलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही जरी व्यक्ती, पक्ष, पार्टी समोर ठेवून आंदोलन करीत नसलो तरी अशा लोकांना आमचे आंदोलन कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा बाजूने केलेले भासते.-अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ