शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडली जनावरे : शेतकरी संघटनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 19:47 IST

दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रूपये हमीभाव द्यावा, तसेच दूध ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत अनोखे आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था शासनाने करावी, अशा घोषणा शेतक-यांनी दिल्या.

अहमदनगर : दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रूपये हमीभाव द्यावा, तसेच दूध ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत अनोखे आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था शासनाने करावी, अशा घोषणा शेतक-यांनी दिल्या.भुमिपूत्र शेतकरी संघटना व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. शेतीमालाला व दूधाला हमीभाव मिळत नसल्याने भाकड जनावरे सांभाळणे कठिण होत आहे. राज्यातील शेतक-यांना उत्पादक खर्चाशी निगडीत दुधाला प्रति लिटर २७ रूपये भाव मिळणे गरजेचे असताना केवळ १७ रूपयांचा भाव मिळतो. दूध संकलन करणारे संघ किंवा कंपन्या भेसळ करुन एका टँकरचे तीन टँकर करुन ग्राहकांना विकतात. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यातून राज्यात दूध माफिया तयार झाले आहेत. या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणा-या दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची भेसळयुक्त दुधाने त्यांच्या प्रतिकात्मक दगडाची तुला यावेळी करण्यात आली. शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी होवून, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देण्यात आले.आंदोलनात भुमिपूत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, पीपल्स हेल्पलाईनचे अ‍ॅड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, राज्य प्रवक्ते अनिल देठे, संतोष कोरडे, रोहन आंधळे, संतोष हंडे, दिलीप कोकाटे, संजय भोर, गणेश सुपेकर, निलेश औटी, सुनीता चव्हाण, सुनील खोडदे, निलेश तळेकर, विश्वनाथ औताडे, सचिन ईरोळे, मंजाबापू वाडेकर, व्ही. के. खाडे, काशिनाथ गोके, निलेश भोर, बाळासाहेब दरेकर आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.नगर तहसीलवरही आंदोलनप्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने नगर तहसील कार्यालयावरही हे आंदोलन करण्यात आले. शेतक-यांनी यावेळी भाकड जनावरे व म्हातारे बैल आणले होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बारस्कर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मणराव पोकळे, कार्याध्यक्ष विनोदसिंग परदेशी, भाऊसाहेब मोढवे, विजय मस्के, बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली पद्धतशीरपणे शेतकºयांचे आंदोलन दडपले. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असे बारस्कर महाराज म्हणाले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय