शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

वरखेडच्या यात्रेत पशुहत्या, दारूबंदीचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:20 IST

भेंडा : वरखेड (ता. नेवासा ) येथे ५ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या महालक्ष्मी यात्रेत व नंतरही मंदिर परिसरात पशुहत्या ...

भेंडा : वरखेड (ता. नेवासा) येथे ५ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या महालक्ष्मी यात्रेत व नंतरही मंदिर परिसरात पशुहत्या व अवैध दारु विक्रीला बंदी घालणारा आदेश धर्मदाय उपआयुक्त व नेवासा तहसीलदारांनी मंदिर विश्वस्त मंडळाला बजावला आहे.यात्रेत सुमारे ३० ते ३५ हजार बोकड व कोंबड्या नवसापोटी कापल्या जातात. राज्यात पशुहत्या बंदी कायदा लागू असतानाही यात्रेत कायद्याचे उल्लंघन होते. पशुहत्या ही प्रथा अमानवीय व अनैसर्गिक आहे. पशुहत्या प्रथा ही पर्यावरण व बालकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करणारी आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यवाह अ‍ॅड. रंजना गवांदे, सल्लागार कॉ. बाबा आरगडे यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी, धर्मदाय उपायुक्त व नेवाशाचे तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत धर्मदाय उपायुक्त व नेवासा तहसीलदारांनी वरखेड महालक्ष्मी मंदिर विश्वस्त मंडळाला पशुहत्या व अवैध दारु विक्री रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.आदेशात मंदिर विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरात पशुहत्या व अवैध दारू विक्री होणार नाही, पशुहत्या बंदी कायद्याचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, नागरिकांच्या सभा घेऊन त्यांना पशुहत्येपासून होणारे दुष्परिणाम सांगावे, गावात सार्वजनिक ठिकाणी व यात्रा परिसरात जनजागृती करणारे फलक लावावे, मंदिरात व मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे व यात्रा कालावधीत ड्रोन कॅमेरा लावून चित्रीकरण करावे, वाहनावर ध्वनीक्षेपक लावून गावात व यात्रेत पशुहत्या बंदीबाबत जनजागृती करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पशुहत्या बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाचा निकाल व राज्य शासनाचा कायदा आहे. वरखेड यात्रेत पशुहत्या झाल्यास न्यायालयाचा अवमान व पशुहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मंदिर विश्वस्त मंडळाविरुद्ध कायदेशीर कारवाई करीन.-कॉ. बाबा आरगडे, सल्लागार, अंधश्रध्दा निर्मूलन समिती .

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा