शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

संतप्त महिलांचा गटविकास अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 23:25 IST

अहमदनगर : पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त झालेल्या इमामपूरच्या सुमारे ३० ते ४० महिलांनी नगरच्या गटविकास अधिकारी रेश्मा होजगे यांना सोमवारी घेराव

जिल्हा परिषदेतील घटना : सलग दुसऱ्या आठवड्यात आंदोलनअहमदनगर : पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त झालेल्या इमामपूरच्या सुमारे ३० ते ४० महिलांनी नगरच्या गटविकास अधिकारी रेश्मा होजगे यांना सोमवारी घेराव घालत जिल्हा परिषदेत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत दणाणून गेली. इमापूरचे सरपंच, ग्रामसेवक यांच्या आडमुठ्या धोरणामुळे गावातील महिलांना एक किलोमीटर लांबवरून टँकरचे पाणी आणावे लागत आहे. गावात खासगी व्यक्तीने हौद बांधून तो ग्रामपंचायतीला दिला. मात्र, त्यात पाणी साठवण्याऐवजी एक किलोमीटरवर पाणी टाकण्यात येत आहे. या विरोधात तक्रार, आंदोलन करूनही उपयोग न झाल्याने सोमवारी दुपारी हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या कार्यालयाबाहेर घडला. इमामपूर येथील ३० ते ४० महिला पाणीप्रश्न घेवून थेट जिल्हा परिषदेत आल्या. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय गाठले. त्या ठिकाणी या महिलांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्या ठिकाणी गटविकास अधिकारी होजगे आल्या. संतप्त झालेल्या महिलांनी आमच्या पाण्याची काय सोय लावली, असा सवाल करत होजगे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव या ठिकाणी आले. त्यांनी संतप्त महिलांना शांत करत हा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना होजगे यांना दिल्या. हा प्रकार साधारण अर्धा तास सुरू होता. महिलांच्या घोषणाबाजमुळे जिल्हा परिषदेची इमारत दणाणून गेली. गेल्या आठवड्यात या गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात आंदोलन केले होते. त्यावेळी हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याऐवजी हा प्रश्न तसाच ठेवल्याने जिल्हा परिषदेत सोमवारी पुन्हा आंदोलन झाले. (प्रतिनिधी)