शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मानधनाअभावी अंगणवाडी सेविकांवर आली शेतात रोजंदारी करण्याची वेळ; मानधनासाठी श्रीगोंद्यात काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:10 IST

श्रीगोंदा तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन थकले आहे. त्यामुळे पोटासाठी अंगणवाडी सेविकांना शेतात रोजंदारीवर काम करण्याची वेळ आली आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन थकले आहे. त्यामुळे पोटासाठी अंगणवाडी सेविकांना शेतात रोजंदारीवर काम करण्याची वेळ आली असून, मानधन मिळावे, यासाठी अंगणवाडी सेविकांनी सोमवारी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षा नंदाबाई पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी अलका शिरसाठ व प्रकल्प अधिकारी शैला खामकर यांना निवेदन देण्यात आले. अंगणवाडी सेविकांशी चर्चा करताना अलका शिरसाठ म्हणाल्या, शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन त्यांच्या बँक खात्यावर आॅनलाईन पद्धतीने जमा करण्यास सुरूवात केली आहे. आॅनलाईन पद्धतीने मानधन जमा करण्यात काही अडचणी आल्या आहेत. आठ दिवसात सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन बँकेत जमा होईल़ तसेच इतर प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्प अधिकारी शैला खामकर यांनी युनियन पदाधिका-यांबरोबर बैठक घ्यावी.नंदाबाई पाचपुते म्हणाल्या, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तीन महिन्यापासून मानधन नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. काही अंगणवाडी सेविका कांदा लावण्यासाठी जात आहेत. आता मानधन जमा न झाल्यास प्रकल्प कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी संगीता इंगळे, मनिषा माने, रजनी क्षीरसागर, छाया भागवत, वैष्णवी ढवळे, सुमन पाचपुते, सुनंदा पडवळ, चंद्रकला सुपेकर, स्वाती भंडारी, मीना जायकर आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा