शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीच्या मुलांची शाळा भरतेय झाडाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:36 IST

वाळूंज शिवारातील पारधी वस्तीची मात्र परवड आहे. या वस्तीच्या अंगणवाडीसाठी इमारत मंजूर आहे. मात्र, वर्षानुवर्षे हे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने उन, पावसात या मुलांची झाडाखाली अंगणवाडी भरत आहे.

अहमदनगर : आदिवासी समाजासाठी मोठ्या प्रमाणावर निधी असतानाही वाळूंज शिवारातील पारधी वस्तीची मात्र परवड आहे. या वस्तीच्या अंगणवाडीसाठी इमारत मंजूर आहे. मात्र, वर्षानुवर्षे हे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने उन, पावसात या मुलांची झाडाखाली अंगणवाडी भरत आहे. महिला बालविकास विभागाचे स्थानिक अधिकारीही या अंगणवाडीकडे  फिरकत नाहीत. वाळुंज-नारायणडोहो शिवारात पारधी समाजाची ३० ते ४० कुटुंबांची वस्ती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज येथे वास्तव्य करत आहे. परंतु शासनाचे या समाजाकडे कायमच दुर्लक्ष झालेले आहे. येथे ६० ते ६५ मुले अंगणवाडीत येतात. अंगणवाडीच्या इमारतीचे काम १० वर्षांपूर्वी सुरू झाले होते. परंतु केवळ भिंती उभा केल्या गेल्या. त्यावर अद्याप छत पडलेले नाही. इमारतीसाठीचा निधी कोठे गेला? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ही सर्व मुले पालाबाहेर एका झाडाखाली वर्षानुवर्षांपासून उघड्यावर अंगणवाडीत येतात. अंगणवाडीच उघड्यावर म्हटल्यावर मुलांसाठीचा आहार कोठे शिजवायचा हाही मोठा प्रश्न. त्यामुळे येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या घरून आहार शिजवून तो दुचाकीवर पारधी वस्तीपर्यंत आणतात. वस्तीवर आल्यावर मुलांना गोळा केले जाते. मग एका झाडाखाली ही अंगणवाडी भरते. महिला बालकल्याण विभागाचे स्थानिक प्रकल्प अधिकारी या अंगणवाडीला नियमित भेटी देतात का? ते भेट देत असतील तर इमारत अपूर्ण कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बांधकामाच्या निधीत अपहार झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगर तालुक्यात किती गावांत अंगणवाडयांची दुरवस्था आहे, असाही प्रश्न समोर आला आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzp schoolजिल्हा परिषद शाळा