शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाश्रम स्वामी देवस्थानमुळे सुरेगाव बनले आध्यात्मिक केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:13 IST

अध्यात्मिक गुरु प.पु.आनंदाश्रम स्वामींचे जन्मस्थान म्हणून पावन झालेल्या सुरेगावला आध्यात्मिक केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे.

अध्यामित्क - नानासाहेब जठार /अध्यात्मिक गुरु प.पु.आनंदाश्रम स्वामींचे जन्मस्थान म्हणून पावन झालेल्या सुरेगावला आध्यात्मिक केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. आनंदाश्रम यांचे मूळ नाव श्रीधर नरहरी कुलकर्णी होते. त्यांचा जन्म १९१० साली श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथे कुलकर्णी घराण्यात झाला. त्यांना लहानपणापासून भजनाचा छंद होता. त्यांनी आध्यात्माचा ध्यास घेतला होता. ते मोठे झाल्यावर त्यांच्या आईने त्यांच्या लग्नाचा प्रयत्न सुरु केला. परंतु विवाह बंधनात अडकने त्यांना मान्य नव्हते. ईश्वर सेवा करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. त्यामुळे त्यांनी लग्न न करता घर व गाव सोडण्याचा निर्णय घेतला. सुरेगावातून निघून ते तडक अलाहाबादला गेले. त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावर त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या संपवून आल्यानंतर त्यांनी आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांची सेवा सुरु केली. इंद्रायणी काठी कन्हैया आश्रमातून त्यांनी शिष्यांना आध्यात्माचे धडे द्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी राज्यभर अनेक प्रवचने केली. नाना महाराज साखरे यांच्याकडून दीक्षा घेऊन पुढे कैवल्याश्रम स्वामी महाराज यांच्याकडून संन्यासाचा मार्ग स्वीकारला. नर्मदा नदीच्या तीरावर व्यास क्षेत्री संन्यास घेऊन गरुडेश्वराचे तीर्थस्थानी साधना केली. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचे गुरु कैवल्याश्रम यांच्या सांगण्यानुसार आनंदाश्रम स्वामींनी त्यांचे जन्मस्थान असलेल्या सुरेगाव येथे मोठ्या प्रमाणात भेटी दिल्या. मृत्यूपश्चात त्यांच्या जन्मगावी सुरेगाव येथेच समाधीस्थ होण्याची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी त्याठिकाणी तशी व्यवस्था करुन ठेवली होती. अखेर ६ जून २००२ रोजी त्यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आळंदी येथे देहावसान झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची समाधी आळंदी येथेच तयार करावी असा अनेक भक्तांचा आग्रह होता. मात्र आनंदाश्रम स्वामींची इच्छा असल्याने सुरेगाव येथे त्यांची समाधी तयार करण्यात आली. आता मात्र सुरेगाव हे आनंदाश्रम स्वामींच्या समाधीमुळे आध्यात्मिक केंद्र बनले आहे. सध्या आनंदाश्रम स्वामींच्या समाधी स्थळाची पूजा अर्चा व सेवा त्यांचे वंशज हभप दिलीप काका कुलकर्णी  करीत आहेत. देवस्थानचे व्यवस्थापन संतोष शिंदे पाहत आहेत. आनंदाश्रम स्वामी देवस्थान समितीचे अध्यक्ष मनमोहनसिंग कोचर, कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुश रोडे, सरपंच सर्जेराव रोडे, पोपटराव रोडे हे देवस्थानच्या कामकाजात नेहमी लक्ष  देत असतात. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिकShrigondaश्रीगोंदा