संगमनेर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या पदविका परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.
कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिव्हिल इंजिनिअरिंग या विभागाच्या निकाल शंभर टक्के लागला आहे, असे तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी सांगितले. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागात तृतीय वर्षातील तेजल वाकचौरे हिने ९६ .५१ टक्के गुण मिळवून अमृतवाहिनी तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात आयेशा हकीम, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात शिवम कांडेकर, मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागात अथांग देशमुख, ऑटोमोबाईल इंजिनअरिंग विभागात वैभव नेहे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात सिद्धी कानवडे, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभाग प्रतिक्षा बागड (९०.८० टक्के), मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग धनंजय घुले (८८.८०) टक्के, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभाग योगेश्वरी दिघे (८७.९४ टक्के), सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग आदित्य कांबळे (८३.१२ टक्के), ऑटोमोबाईल इंजिनअरिंग विभाग सुयश खांडगे (८२.०५ टक्के) या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
सर्वेश हासे, मयूर मगर, जान्हवी नवले, साई कवडे, अनिकेत देशमुख, अनिकेत जोंधळे, दानीश सय्यद, तनिष्क शिंदे, श्रेया भालेराव, अभिजीत देशमुख, ययाती नेहे, ऋषीकेश ढाकणे, शुभम भामरे प्रणोती वाळे, सुजीत फटांगरे, प्रमोद घुगे यांनी यश मिळवले. तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ, उपप्राचार्य प्रा. जी. बी. काळे, प्रा. बी. एल. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, शरयू देशमुख, अॅड. आर. बी. सोनवणे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदींनी कौतूक केले.
(वा. प्र.)