पाथर्डी : शहरातील अमोल भैया गर्जे मित्रमंडळाच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुसज्ज १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.
त्याचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. प्रांताधिकरी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना ४ तज्ज्ञ डॉक्टर व ४ नर्स, आवश्यक औषधोपचार यासह दोन वेळा नाष्टा व जेवण, अशी सुविधा सामाजिक जाणिवेतून दिली जाणार असल्याची माहिती अमोल गर्जे यांनी दिली.
यावेळी डॉ. भगवान दराडे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गोकुळ दौंड, नायब तहसीलदार पंकज नेवसे, नगरपरिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, भाजयुमोचे नेते मुकुंद गर्जे, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, नगरसेवक बंडू बोरुडे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सीताराम बोरुडे, भाजप शहराध्यक्ष अजय भंडारी, अर्जुन धायतडक, बंडू दानापुरे आदी उपस्थित होते.
---
१४ पाथर्डी कोविड सेंटर
अमोल गर्जे मित्रमंडळाच्या वतीने पाथर्डी येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करताना प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, अमोल गर्जे व इतर.