शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अमोल कर्डिलेच्या मित्रांना घेतले ताब्यात

By admin | Updated: April 28, 2016 23:20 IST

पारनेर : पारनेर पोलीस ठाण्याच्या तुरूंगात असलेला कुरूंद येथील अमोल कर्डिले पळून गेल्यानंतर आता त्याच्यासह पोलिसांबरोबर असलेल्या पारनेरमधील चार ते पाच मित्रांना सुपा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले

पारनेर : पारनेर पोलीस ठाण्याच्या तुरूंगात असलेला कुरूंद येथील अमोल कर्डिले पळून गेल्यानंतर आता त्याच्यासह पोलिसांबरोबर असलेल्या पारनेरमधील चार ते पाच मित्रांना सुपा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नगर न्यायालयातून पोलीस अमोलसह थेट गव्हाणवाडी येथेच गेल्याचे जबाब काही प्रत्यक्षदर्शींनी दिल्याची माहिती पुढे आले आहे. यामुळे या प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे.पारनेर पोलीस ठाण्यात विविध हाणामाऱ्या व इतर गुन्हे प्रकरणी अमोल भाऊसाहेब कर्डिले याला २५ एप्रिल रोजी पारनेरचे पोलीस कुंडलिक आरवडे व रवींंद्र कुलकर्णी यांनी नगरच्या न्यायालयात नेले. तेथून येताना सुपा येथे लघुशंकेसाठी उतरलेला कर्डिले पोलीस कुलकर्णी यांच्या हाताला हिसका देऊन बेडीसह पळून गेल्याची फिर्याद पोलीस आरवडे यांनी सुपा पोलीस ठाण्यात पहाटे ३.४५ वाजता दिली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी दोघा पोलिसांना निलंबितही केले आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने गुरूवारी पोलीस आरवडे व कुलकर्णी व अमोल कर्डिले यांच्या एकत्रित चित्रफितीचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर जिल्हा पोलिसांमध्ये खळबळ उडाली. अमोल पळून गेल्याची पोलिसांची फिर्यादच संशयाच्या भोवऱ्यात आहे. पारनेरमधील चौकशीसाठी ताब्यात घेतलेले चार ते पाच युवक कर्डिले याची पाठराखण करीत होते की त्यांचाही घटनेत सहभाग आहे का? याची चौकशी सुपा पोलीस करणार आहेत. याप्रकरणी आता पोलीस कुंडलिक आरवडे व रवींद्र कुलकर्णी यांचीही चौकशी होणार असून त्यांनी अमोल कर्डिलेला पळून जाण्यास मदत केली की अमोल खरोखरच पळाला याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणाने पोलीस दलाची नाचक्की होत आहे. या दोन पोलिसांची कोणतीही गय केली जाणार नसल्याची भूमिका पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी घेतली आहे. नगर येथील न्यायालयातून पारनेरचे पोलीस कुंडलिक आरवडे, रवींद्र कुलकर्णी यांनी आरोपी अमोल कर्डिले याला घेऊन मध्ये कुठेही न थांबता थेट गव्हाणवाडी गाठले. फक्त न्यालालयाच्या आवारात त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर गव्हाणवाडी येईपर्यंत तो मोकळाच होता, अशीही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे समजते. यामुळे पोलिसांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.