शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हौशी नाट्य स्पर्धा : उद्या उघडणार ‘राज्य नाट्य’चा पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 14:16 IST

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे.

अहमदनगर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. माउली सभागृहात रोज सायंकाळी ८ वाजता नगरकरांना दर्जेदार नाटकांची मेजवानी मिळणार आहे.राज्यातील सर्वाधिक प्रतिसाद असलेल्या नगर केंद्रावर या वर्षी तब्बल १९ नाट्य संस्थांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे़ १५ नोव्हेंबर रोजी ‘तुकाराम कोळ्याची पोर’ (अपंग विकास संस्था, श्रीरामपूर), १६ नोव्हेंबरला ‘मुंबई मान्सून’ (एकात्मता मंच, नगर), १७ नोव्हेंबरला ‘छत्रपती शिवरायांचा जिहाद’ (एफ़ के़ क्रिएशन, शेवगाव), १८ नोव्हेंबरला ‘तीस तेरा’ (जिप्सी प्रतिष्ठान, नगर), १९ नोव्हेंबरला ‘ती खिडकी’ (कलासाई नाट्यसंस्था), २० नोव्हेंबरला ‘अनफेअर डील’ (कर्णेज अकॅडमी, श्रीरामपूर), २१ नोव्हेंबरला ‘द ग्रेट एक्सचेंज’ (नगर अर्बन बँक), २२ नोव्हेंबरला ‘पुत्रकामेष्टी’ (देऊळगाव), २३ नोव्हेंबरला ‘उदरभरणम्’ (नटेश्वर मंडळ, राहुरी), २४ नोव्हेंबरला ‘आणखी एक द्रोणाचार्य’ (नाट्य आराधना, नगर), २५ नोव्हेंबरला ‘भयरात्र’ (नवरंग प्रतिष्ठान, शेवगाव), २६ नोव्हेंबरला ‘अशुद्ध बीजापोटी’ (रंगकर्मी प्रतिष्ठान, नगर), २७ नोव्हेंबरला ‘प्रभाग’ (रंगोदय प्रतिष्ठान), २८ नोव्हेंबरला ‘इथॉस’ (साईप्रित प्रतिष्ठान, नगर), २९ नोव्हेंबरला ‘नजरकैद’ (समर्थ प्रतिष्ठान, घोडेगाव), ३० नोव्हेंबरला ‘आणि धम्म’ (सप्तरंग थिएटर्स, नगर), १ डिसेंबरला ‘ओझं’ (सर्व मंगल संस्था, नगर), ३ डिसेंबरला ‘प्यादं’ (स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळ, नगर), ४ डिसेंबरला ‘बाईपण’ (विश्वकर्मा क्रीडा मंडळ) ही नाटके होणार आहेत़ग्रामीण नाट्य संस्थांचा सहभाग वाढलास्पर्धेत दरवर्षी ग्रामीण नाट्य संस्थांचा सहभाग कमी असतो़ मात्र, यंदा तब्बल आठ ग्रामीण संस्थांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे़ श्रीरामपूर, शेवगाव, कोपरगाव, देऊळगाव (ता़ नगर), राहुरी, घोडेगाव (ता़ नेवासा) येथील नाट्य संस्था या वर्षी नगरकरांसाठी उत्तम सादरीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत़ त्यादृष्टीने त्यांच्या तालमीही सुरु आहेत.सलग तिसऱ्या वर्षी मेहेत्रे समन्वयकपदीराज्य नाट्य स्पर्धेत नगर केंद्रावर दरवर्षी नवीन समन्वयक दिला जात होता़ मात्र, सलग तिसºयावर्षी सागर मेहेत्रे यांच्यावर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने विश्वास दाखवत त्यांना समन्वयकपदी नियुक्त केले आहे़ गुरुवारी (दि़१५) सायंकाळी ७ वाजता माउली सभागृहात ज्येष्ठ रंगकर्मी डॉ़ सोमनाथ मुटकुळे, दीपक घारु यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर