शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेकरुंना जम्मूतील गुंडांकडून दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:33 IST

श्रीगोंदा: अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील सात भाविकांना जम्मुतील गुंडांकडून दमदाटी करण्यात आली. यात्रेकरुंकडून ही माहिती मिळाल्यानंतर

श्रीगोंदा: अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील सात भाविकांना जम्मुतील गुंडांकडून दमदाटी करण्यात आली. यात्रेकरुंकडून ही माहिती मिळाल्यानंतर नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी खासदार दिलीप गांधी व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. या नेत्यांनी सूत्रे हलविल्यानंतर या भाविकांना रात्री स्थानिक पोलिसांची मदत मिळाली. नंतर पोलीस संरक्षणात या भाविकांना अमृतसर रेल्वे स्थानकात सोडण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यातील अशोक देवधर (श्रीगोंदा फॅक्टरी), दादा करांडे (श्रीगोंदा स्टेशन), अर्जून शेलार (श्रीगोंदा) हे भाविक अमरनाथ यात्रेसाठी सहकुटुंब गेले आहेत. यामध्ये चार पुरुष, तीन महिला भाविकांचा समावेश होता. अमरनाथ दर्शन करुन सोमवारी रात्री हे सर्वजण परतीच्या प्रवासासाठी जम्मू येथे आले. येथून परिवहन मंडळाच्या बसने ते रात्री अमृतसरकडे रवाना होण्यापूर्वीच जम्मुतील स्थानिक गुंडांनी त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. बस अमृतसरकडे निघाल्यानंतर ही दमबाजी वाढतच गेली. हिंदीतून भाविकांना दमदाटी करणारांची संख्या वाढू लागली. बसमधील काही महिला सहप्रवाशी या स्थानिक गुंडाच्या सहकारी असल्याचे अशोक देवधर यांच्या लक्षात आले. भाविक यात्रेकरू व महिलांना हिंदीतून केली जाणारी दमबाजी व शेरेबाजी यामुळे भीतीचे वातावरण झाले. देवधर यांनी रात्री दहाच्या सुमारास गुंडांची नजर चुकवून राजेंद्र नागवडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. नागवडे यांनी तत्काळ बाळासाहेब थोरात व दिलीप गांधी यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडीक यांनाही माहिती देऊन खा.गांधी यांच्याशी संपर्कात राहून मदतीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. ( तालुका प्रतिनिधी) खा. गांधी यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून भाविकांना पोलिसांची मदत देण्याची विनंती केली. आमदार थोरात यांनी जम्मू व अमृतसरमधील पोलीस मुख्यालयाशी संपर्क केला. देवधर व सहप्रवाशी अमृतसर येथे रात्री सव्वा अकरा वाजता बसमधून उतरताच त्यांना तेथील विभागीय पोलीस महासंचालकांनी धीर दिला. दोन पोलीस शिपाई या यात्रेकरुंच्या मदतीला दिले. पोलिसांनी या यात्रेकरुंना बंदोबस्तात अमृतसर रेल्वे स्थानकात सोडले.