शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गोर-गरिब शेतकºयांचे दु:ख दूर करण्यासाठी स्व. विखे यांचा देह सत्कारणी - पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 12:04 IST

अहमदनगर : गोर-गरीब, शेतकºयांचे दु:ख जाणने, त्यांचे दु:ख दूर करणे हेच स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे जीवन होते. याचसाठी त्यांनी आपला देह सत्कारणी लावला, असे गौरवोद्वगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

अहमदनगर : गोर-गरीब, शेतकºयांचे दु:ख जाणने, त्यांचे दु:ख दूर करणे हेच स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे जीवन होते. याचसाठी त्यांनी आपला देह सत्कारणी लावला, असे गौरवोद्वगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

स्व. विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचे व्हॅर्च्युअल प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.  स्व. विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, शेतकरी, सामान्यांचे जीवन सोपे करणे हे स्व. विखे पाटील यांचा जीवनाचा मंत्र ठरला. समाजासाठीच राजकारण व सत्ता हे मी कायम संभाळले. राजकारण करताना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठीच त्यांचाभर राहिला. सत्ता व राजकारणाचा उपयोग त्यांनी सामान्यांच्या उद्धारासाठीच केला. 

 गाव आणि गरिबांच्या समस्यांचे समाधान कसे होईल, हाच त्यांचा विचार होता. गाव, गरीबांच्या विकासासाठी, शिक्षणासाठी, महाराष्ट्रातील सहकाराचा विकास करण्यासाठी त्यांनी केलेले काम प्रेरणादायी आहे. युवापिढीसाठी त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. गाव,गरिब आणि शेतकºयांचे दु:ख त्यांनी जवळून पाहिले. त्यांना सरकारशी जोडले, हे विखे पाटलांचे प्रयत्न राहिले. अनेक गावांचा चेहरामोहरा त्यांनीबदलला.सहकारी चळवळ ही खरी निधर्मी चळवळ आहे. ती कुठल्या जातीची किंवा धर्माची नाही. आतापर्यंत सगळ््या समाजाला प्रतिनिधीत्त्व दिले आहे. हाच सहकाराचा विचार त्यांनी मांडला. सहकारात सर्व वर्गाचे प्रतिनिधीत्त्व होते. सर्वांच्या कल्याणाचा सहकार हा मार्ग राहिला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, त्यावेळी संपूर्ण देशात सहकाराचा विकास करण्यासाठी प्रचार केला. ग्रंथाचे शिर्षक हे प्रेरणादायी आहे. संत तुकाराम महाराज यांच्या या पंक्तीमध्ये स्व. विखे पाटील यांच्या कार्याचे सार आहे.

प्रवरा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी युवकांना शिक्षण, कौशल्याच्या विकासाचा मार्ग दिला. युवकांना प्रेरणा दिली. म्हणूनच प्रवरा संस्थेला स्व. बाळासाहेब यांचे नाव सार्थ आहे. गावामध्ये शेती आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.  व्यक्ती कितीही मोठा असला तरी शेतीचे कौशल्य नसेल तर तो काहीही करू शकत नाही.

शेती ही निसर्गाधारीत, असावे. हेच त्यांनी सांगितले. शेतीच्या प्रगतीसाठी जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा मेळ घालून प्रगती करण्याची गरज आहे. कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रगतीसाठी प्रोत्साहन देत आहे. हा पैसा शेतकºयांच्याच खिशात येईल.  पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाणी परिषदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी काम केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNarendra Modiनरेंद्र मोदी