कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाथरे गावातील दोन व्यक्ती नुकत्याच कोरोना बाधित आढळल्या आहे. ते दोघे काही दिवसापूर्वी कोपरगाव तालुक्यातील एका गावात्तील नातेवाईक कुटुंबाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील तीन व्यक्ती त्यामध्ये एक पुरुष व दोन महिला आहे. या तिघानाही कोपरगावच्या आरोग्य विभागाने रविवारी ( दि.१९ ) सायंकाळी तत्काळ तपासणीसाठी नगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविले. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी दिली आहे. दरम्यान या तीनही व्यक्तींचे गावात आणखी कुणाशी संबध आला या संदर्भात आरोग्य विभाग माहिती घेत आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे.
कोपरगावच्या तिघांना तपासणीसाठी नगर येथे पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:20 IST