शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकासाठी पाचही अर्ज बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 17:28 IST

अहमदनगर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल व्दिवेदी यांनी नियमांवर बोट ठेवत पाचही अर्ज बाद केले.

अहमदनगर : महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल व्दिवेदी यांनी नियमांवर बोट ठेवत पाचही अर्ज बाद केले. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी त्यांची शिफारस मान्य करीत पुन्हा सभा बोलविण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. महापालिकेच्या स्वीकृत पाच नगरसेवकांचे निवडीसाठी मनपा सभागृहात शुक्रवारी अकरा वाजता सभेला सुरुवात झाली. प्रभारी आयुक्त राहुल दिवेदी यांनी त्यांच्याकडे दाखल केलेले पाचही अर्ज नियमानुसार अपात्र ठरत आहेत,अशी शिफारस सभागृहात केली. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. नगरसेवकांनी आयुक्तांनी अपात्र ठरविले असले तरी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार या सभागृहाला आहे, अशी मागणी करीत या पाचही नगरसेवकांच्या या निवडी महापौरांनी जाहीर कराव्यात. तसेच जे कागदपत्र अपुरे आहेत, ते सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी मागणी सदस्यांनी महापौरांकडे केली. यावर सभागृहात बराच वेळ चर्चा झाली. अखेर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्तांनी केलेली अपात्रतेची शिफारस मान्य करून स्वीकृतसाठी पुन्हा सभा बोलविण्यात येईल, असा निर्णय दिला. त्यामुळे स्वीकृतसाठी दाखल झालेले पाचही अर्ज बाद ठरले. ही राज्यातील पहिलीच घटना असावी.स्वीकृतसाठी काही नियम आहेत. त्यातील सहाव्या नियमांमध्ये सामाजिक संस्थांमध्ये कार्य केलेले व संबंधित संस्था कोणत्या कार्यक्षेत्रात काम करते. याबाबतचे पुरावे पाचही उमेदवारांनी दिलेले नव्हते. त्यांचे अर्ज अपूर्ण होते. त्यामुळे हे पाचही अर्ज बाद करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmemesमिम्सElectionनिवडणूक 2024