अळकुटी : पारनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अळकुटी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. येथे डॉ. कोमल भंडारी यांची सरपंचपदी तर धनंजय घोलप यांची उपसरपंचपदी निवड झाली. आमदार नीलेश लंके गटाला सत्तेपासून दूर ठेवत माजी आमदार विजय औटी गटाने ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविला.
सरपंच व उपसरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मुरलीधर कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी सदस्या सारिका शिरोळे, किरण शिंदे, अरिफ पटेल, बाळासाहेब धोत्रे, कोमल भंडारी, लता घोलप, धनंजय घोलप, मीराबाई शिरोळे, चिमाजी भंडारी, अर्चना पुंडे, आरती साखला, श्वेता शिरोळे, मारुती म्हस्कुले आदी उपस्थित होते.
परिवर्तन पॅनलच्या कोमल संदीप भंडारी यांनी सरपंचपदासाठी, धनंजय भाऊसाहेब घोलप यांनी उपसरपंचपदासाठी तर सहकार पॅनलच्या आरती अतुल साखला यांनी सरपंचपदासाठी, मारुती लक्ष्मण म्हस्कुले यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केला.
परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना सरपंच व उपसरपंचपदासाठी प्रत्येकी ८ मते मिळाली, तर सहकार पॅनलच्या उमेदवारांना प्रत्येकी पाचच मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी मुरलीधर कोरडे व ग्रामसेवक बाळासाहेब काळापहाड यांनी सरपंचपदी कोमल भंडारी व उपसरपंचपदी धनंजय घोलप यांची निवड जाहीर केली.
सन्मान सोहळ्यास सखाराम उजघरे, श्रीपत शिरोळे, सुनील धोत्रे, संजय मते, दत्तात्रय भोसले, दामोधर घोलप, बाळासाहेब ठुबे, रामदास भंडारी, कैलास शिंदे, सागर घोलप, सचिन घोलप, भगवान शिंदे, रूपेश घोलप, स्वप्निल घोलप, संपत जाधव, नंदू जाधव, प्रकाश शिंदे, शिरीष शिरोळे, विकास भंडारी, संदीप भंडारी, बाजीराव शिरोळे, जालिंदर घोलप, विशाल घोलप, आनंद शिरोळे, महीपत शिरोळे, सुभाष भोसले, दीपक कड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.