केडगाव : अकोळनेर ( ता. नगर ) येथील पेशवेकालीन वेस शनिवारी सकाळी अचानक ढासळली. यामुळे कुठलीच जीवित हानी झाली नसली तरी वेस पडल्याने गावाचे वैभव इतिहासजमा झाल्याची खंत गावकºयांनी व्यक्त केली. नगर तालुक्यातील जुन्या वेस पैकी ही वेस मानली जात होती. वाड्यांचे गाव असलेल्या अकोळनेर येथे गावाच्या दर्शनी भागातच पेशवेकालीन वेस आहे. या वेसीचा बुरूज अचानक ढासळला. गावात अनेक जुने वाडे होते यातील काही वाडे अजुनही पहावयास मिळतात. तर काहींचे फक्त अवशेष आहेत. नगर तालुक्यात अनेक गावांमध्ये जुुन्या काळातील वेस आहेत यामध्ये अकोळनेरची वेस सर्वात जुनी असल्याचे गावकरी सांगतात .
अकोळनेरची पेशवेकालीन वेस ढासळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 13:12 IST