शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोले पंचायत समितीत राजकारण तापले; भाजपची गटनोंदणी फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 11:46 IST

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट मधून एक सदस्य सेनेचे अकोले पंचायत समितीचे उपसभापती यांच्याबरोबर गेल्याने ही गटनोंदणी झालीच नाही. भाजपला हा मोठा दणका असून तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. 

अकोले : अकोले पंचायत समितीचे भाजपचे चार व माजी आमदार वैभव पिचड यांच्यासोबत राष्ट्रवादीतून भाजपात आलेले चार असे आठ सदस्य गटनोंदणी करण्यासाठी सोमवारी एकत्र अहमदनगरला पोहचले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट मधून एक सदस्य सेनेचे पंचायत समितीचे उपसभापती यांच्याबरोबर गेल्याने ही गटनोंदणी झालीच नाही. भाजपला हा मोठा दणका असून तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. अकोले पंचायत समितीत विद्यमान सभापती-उपसभापतीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपला असून लवकरच सभपतीपदाची सोडत होणार आहे. सभापती व उपसभापती पदाचे पंचायत समिती सदस्यांना वेध लागले आहेत. सोमवारी सकाळी भाजपचे दत्ता देशमुख, दत्तात्रय बो-हाडे, उर्मिला राऊत, अलका अवसरकर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले माधवी जगधने, गोरक्ष पथवे, सीताबाई गोंदके, सारिका कडाळे असे आठ सदस्य भाजपची गट नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहमदनगर येथे एकत्र गेले. त्यांच्या सोबत पिचड यांचे खाजगी स्विय सहाय्यक होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमधून राष्ट्रवादीचे गटनेते गोरक्ष पथवे यांनी भाजप सदस्यांसोबत न जाण्याचा पवित्रा घेतला. ते विद्यमान उपसभापती मारुती मेंगाळ यांच्यासोबत निघून आले. या वृत्तास मेंगाळ यांनी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला आहे.अकोले पंचायत समितीत सेनेचे सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ, देवराम सामेरे, नामदेव आंबरे असे चार सदस्य आहेत. उपसभापती मारुती मेंगाळ सोडता विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पंचायत समिती सदस्य भाजप उमेदवाराच्या प्रचारात होते. सेनेच्या उपसभापती मेंगाळ यांनी उघडपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. भाजपला पराभवास सामोरे जावे लागल्याने भाजपात गेलेल्यांची चलबिचल सुरु झाली आहे. सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते. मात्र सेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे आदिवासी ठाकर समाजातील रंजना मेंगाळ यांना सभापतीपद मिळाले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेचे सभापती उपसभापती झाले व भाजपला विरोधात बसावे लागले. आता आठ विरुध्द चार असे चित्र बदललेले दिसते. मात्र पंचायत समितीत भाजपचे बहुमत दिसत असतानाच पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्याने पिचड विरोधी भूमिका घेतल्याने राजकीय गोंधळ उडाला आहे.आमची गट भाजपची नोंदणी अडीच वर्षांपूर्वी झाली नव्हती. काल परवा गटनोंदणीसाठी आमचे पंचायत समिती सदस्य अहमदनगरला गेले होते. गटनोंदणी झाली की नाही हे मला माहित नाही, असे भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी सांगितले.     

टॅग्स :akole-acअकोलेPoliticsराजकारण