शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये राजस्थान, गुजरातचे आकाश कंदील बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:31 IST

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी सजली आहे़. दुकानांमध्ये लावण्यात आलेले वेगवेगळ्या आकारातील हे कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून, खरेदीसाठी गर्दी होत आहे़.

अहमदनगर : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी सजली आहे़. दुकानांमध्ये लावण्यात आलेले वेगवेगळ्या आकारातील हे कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून, खरेदीसाठी गर्दी होत आहे़. दिवाळीत आकाशकंदिलाचे सर्वांनाच मोठे आकर्षण असते़ घरांच्या छतावर, पडवीत हे कंदील लावले जातात़. दिवाळीनिमित्त बाजारात यंदा विविध आकार आणि प्रकारातील कंदील उपलब्ध झाले आहेत़. यंदा स्वदेशी बनावटीच्या कंदिलांची सर्वाधिक विक्री होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले़. काही प्रमाणात चीन बनावटीचेही कंदील बाजारात आहेत़. ग्राहकांनी मात्र हॅण्डमेड असलेल्या भारतीय कंदिलांनाच पसंती दिल्याचे दिसत आहे़. घुमट, त्रिकोणी, चौकोनी, चांदणी, लंबाकृती, गोलाकार, पॅरेशूट, हंडी या आकारातील कंदील कापड, स्पंज, कागद, बांबूच्या काड्या, लाकूड यापासून बनविलेले आहेत़. या कंदिलांवर रंगीबेरंगी कागद व मोत्यांची डिझाईन बनविलेली आहे़. ५० रुपयांपासून ते १ हजार रुपयांपर्यंत आकाशकंदिल विक्रीसाठी उपलब्ध आहेत़. नगर शहरात मुंबई, राजस्थान, गुजरात आदी ठिकाणातून आकाशकंदिल आणले जातात़. काही ठिकाणी स्थानिक कारागिरही कंदील बनवितात़. अ‍ॅटोमॅटिक कंदिलांनाही ग्राहकांची पसंती पारंपरिक आकाशकंदिलांसह विविध रंगातील रेडिमेड लाईटिंग असलेले आकाशकंदिल इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये दाखल झाले आहेत़. या कंदिलांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे़. यंदा कंदिलाच्या दरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे़. शहरासह जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून चांगला पाऊस झाल्याने दिवाळी खरेदीसाठी बाजारात उत्साह दिसत आहे़. त्यामुळे दिवाळीपूर्व खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे़. यंदा बाजारात वेगवेगळ्या आकारातील आकर्षक आकाशकंदिल दाखल झाले आहेत़. कापडी आणि हॅण्डमेड कंदिलांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे़. येत्या दोन ते तीन दिवसांत खरेदीसाठी ग्राहकांची आणखी गर्दी वाढेल, असे विक्रेते नितीन एकाडे यांनी सांगितले.

टॅग्स :MarketबाजारAhmednagarअहमदनगर