शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला खासदारकीचे डोहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:58 IST

अहमदनगर शहरातील नेत्यांकडून सध्या दिवाळी फराळाच्या माध्यमातून राजकीय फटाके फोडले जात आहेत. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे लागले आहेत.

अहमदनगर : शहरातील नेत्यांकडून सध्या दिवाळी फराळाच्या माध्यमातून राजकीय फटाके फोडले जात आहेत. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे लागले आहेत. आमदार होण्याचे अनेकांना स्वप्न आहे, मात्र अनिल राठोड हे आमदारकी सोडायला तयार नसल्याचे वक्तव्य करून शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी राठोड यांच्यावरच निशाणा साधला आहे, तर कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रह धरला आहे.दिवाळीनिमित्त सध्या राजकीय नेत्यांकडून दिवाळीचे फराळ सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. यानिमित्ताने राजकीय नेतेमंडळीही एकत्र येत आहेत. वाढदिवस असो, की दिवाळी फराळ अशा कार्यक्रमांमधून आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी केली जात आहे. आगामी महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा सध्या शहर जिल्हा भाजपकडून केला जात आहे. याशिवाय आमदारकीवरही भाजपचाच डोळा आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २२) माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा वाढदिवस व दिवाळी फराळाच्या निमित्ताने बुरुडगाव रोडवर शिवसेनेचा अनौपचारीक मेळावा झाला. या मेळाव्याला शिवसेनेचे सर्व नेते, महापालिकेतील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यानिमित्ताने फुटलेल्या राजकीय फटाक्यांमधून शिवसेनेची आगामी वाटचाल स्पष्ट झाली.या मेळाव्यात शिवसेनेने थेट दक्षिणेच्या खासदारकीवरच दावा केला आहे. घनश्याम शेलार यांनी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनीच खासदारकीची निवडणूक लढवावी, असे सांगत पहिला फटाका फोडला. तोच सूर धरत शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी अनिल राठोड हे काही आमदारकी सोडायला तयार नसल्याचे सांगून सर्वांच्याच मनातील खदखद व्यक्त केली. त्यामुळे इच्छुकांना खासदारकी किंवा विधानपरिषदेची निवडणूक लढविण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगत थेट राठोड यांच्यावरच निशाणा साधला. अनिल राठोड यांनी मात्र युती नसल्यानेच आपला पराभव झाल्याची कबुली दिली. भाजपच्या सहकार्याचाही त्यांनी उल्लेख करून आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप युती गरजेची असल्याचे संकेत दिले.माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी भाजपच्या सहकार्याशिवाय शिवसेनेला अस्तित्व नसल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत झालेले शिवसेनेचे महापौर हे भाजपच्याच सहकार्यामुळे झाल्याचे अधोरेखित करून शिवसेना-भाजप युती शहरासाठी आवश्यक असल्याचे सांगत राठोड यांच्या सुरात सूर मिसळला.