शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

११ जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींचा अहमदनगरला हरिनाम सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 16:34 IST

चिचोंडीपाटीलनंतर आता अहमदनगर येथे संत मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त दि. ३ ते १० मे २०१८ दरम्यान किशोरवयीन मुलींचा फिरता अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात फक्त मुलींचाच सहभाग राहणार असून ११ जिल्ह्यातील ४० मुली यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजिका चिचोंडीपाटील येथील लक्ष्मीताई खडके महाराज (वृंदावन) यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देसंत मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त आयोजन ४० मुलींचा सहभागकीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक मुलीच राहणार
अनिल लगडअहमदनगर : चिचोंडीपाटीलनंतर आता अहमदनगर येथे संत मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त दि. ३ ते १० मे २०१८ दरम्यान किशोरवयीन मुलींचा फिरता अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात फक्त मुलींचाच सहभाग राहणार असून ११ जिल्ह्यातील ४० मुली यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजिका चिचोंडीपाटील येथील लक्ष्मीताई खडके महाराज (वृंदावन) यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. परमार्थाचा आनंद समाजाला मिळावा, तसेच प्रत्येक कुटुंबातील लहान मुलींना प्रेरणा मिळावी असा हेतू या कार्यक्रमाचा आहे. संत मुक्ताई चरित्रकथा संगीतमय पध्दतीने सांगणार असून या सप्ताहात जलसंवंर्धन, वृक्षारोपण, स्त्री भ्रूणहत्या, आईवडिलांची सेवा, शेतकरी आत्महत्या रोखणे याविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे. यासाठी हा सप्ताह जाधवनगर, नगर-कल्याण रोड, जाधव पेट्रोलपंपाशेजारी, नालेगाव, अहमदनगर येथे आयोजित केला आहे. या सप्ताहात तीन दिवस पहाटे काकडा, सकाळी विष्णू सहस्त्रनाम, संगीतमय मुक्ताई चरित्रकथा, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत.यात सप्ताहात क्रांतीताई महाराज सोनवणे (रामतीर्थ सालेवडगाव, ता. आष्टी), साक्षीताई महाराज वाघ (कोपरगाव), भाग्यश्री महाराज अंबारे (बीड), कीर्ती महाराज गुंड (आठवड), तेजश्री महाराज दिंडे (आळंदी देवाची), माधुरी महाराज शेरेकर (सिन्नर, जि. नाशिक), वैष्णवी महाराज फिसके (चिचोंडीपाटील), पूजा महाराज कुटे (नेवासा), सपना महाराज साखरे (करमाळा, जि. सोलापूर), मुक्ता महाराज सोनवणे (नाशिक), मोनाली महाराज गोर्डे (संगमनेर), ज्ञानेश्वरी महाराज येवले (जामखेड), लक्ष्मीताई महाराज खडके (भागवताचार्य, वृंदावन, चिचोंडीपाटील) यांचे कीर्तन, प्रचवन होणार आहे. गायनाचार्य, मृदुंगाचार्य, हार्मोनिअम, हरिपाठ यासाठी ११ जिल्ह्यातील ४० मुलींचा सहभाग आहे. १० मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत भागवताचार्य आदितीदेवीजी महाराज निकम (आळंदी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. काकडा भजन उज्ज्वला ठोंबरे, जनाबाई वाडेकर, सुमन कोकाटे, हजारेबाई, अनुसया ठोंबरे, मनिषा काकाटे, संगीता पवार महाराज करणार आहेत.सप्ताहकाळात विश्वनाथ राऊत, बबन बहिरवाल, संभाजी दरोडे, स्वप्नील पवार, संजय घोडके, बबन थोरात, गणेश महाराज, आसाराम साबळे, रखमाजी गाडे, आकाश भोंडवे, माऊली मोरे, राऊतदादा, शालिनी देशमुख, राधाताई सानप, हिराबाई मोकाटे, सोनाली कर्पे, शारदा सूर्यवंशी, सुनीता ढाकणे ही संत मंडळी भेट देणार आहे.
टॅग्स :Ahmednagarअहमदनगर