शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर म्हणजे पैलवानांचे गाव

By admin | Updated: July 25, 2016 00:02 IST

अहमदनगर : नगर है पैलवानांचे गाव आहे. पैलवान हीच नगरची खरी ओळख आहे. शरीर पाळणाऱ्यांचे गाव म्हणजे अहमदनगर आहे.

अहमदनगर : नगर है पैलवानांचे गाव आहे. पैलवान हीच नगरची खरी ओळख आहे. शरीर पाळणाऱ्यांचे गाव म्हणजे अहमदनगर आहे. नगरमध्ये कोणीही भेटला तरी त्याला पैलवान म्हणावे लागते, अशी नगरची ख्याती आहे, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.पाईपलाईन रोडवरील एका खासगी कार्यक्रमासाठी ते रविवारी सायंकाळी नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या नगरच्या अनोख्या ओळखीला उपस्थितांनी दाद दिली. नगर येथील शिवसेनेच्या वर्चस्वाचा त्यांनी ‘पैलवान’की या शब्दातच उल्लेख केला. त्याची पोच घेण्यासाठी त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे कटाक्ष टाकला, त्यावेळी आमदार जगताप यांनी ‘नगरमध्ये पैलवान खूप झाले’, अशी मिश्किल टिप्पण्णी केली. त्यालाही खोतकर यांनी दाद दिली.नगरच्या महापौर सुरेखा कदम यांचे माहेर जालना आहे. अर्जुन खोतकर हे जालन्याचे आमदार आहेत. त्यामुळे महापौर कदम यांनी खोतकर हे आपले काका असून महापौर होण्यासाठी त्यांचीही मोलाची मदत झाल्याचा उल्लेख केला. तर माझी लहान बहिण महापौर झाल्याचा मला आनंद झाला आहे, असे खोतकर यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. अ‍ॅड. अभिषेक भगत हे आपले जावई असून त्यांच्या आग्रहावरून नगरला आल्याचे खोतकर, आमदार शिवाजी चोथे यांनी आवर्जुन सांगितले.दरम्यान मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले याला पाहण्यासाठी पाईपलाईन रोडवर तरुणांची मोठी गर्दी झाली होती. चौगुले यांनी शरीरसौष्ठवच्या अनेक पोझ दिल्या. त्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आणि चौगुले यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांची व्यासपीठावर एकच झुंबड उडाली. दरम्यान तरुणांच्या गर्दीमुळे पाईपलाईन रोडवरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. दरम्यान जालना येथील शिवसेनेचे आमदार असलेले, शेतकऱ्यांच्या आणि जायकवाडी पाणी प्रश्नावर सातत्याने विधानसभेत आवाज उठविणारे खोतकर यांची नुकतीच राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागली. याबद्दल महापौर सुरेखा कदम यांनी त्यांचा सत्कार केला.