शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिका महापौर निवडणूक : शिवसेना-राष्ट्रवादीचे नगरसेवक सहलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 11:32 IST

भाजपने कोणालाही उमेदवारी जाहीर केली नसली तरी महापौरपदासाठी नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी स्वत:हुन मोर्चेबांधणी केली आहे.

अहमदनगर : भाजपने कोणालाही उमेदवारी जाहीर केली नसली तरी महापौरपदासाठी नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी स्वत:हुन मोर्चेबांधणी केली आहे. खबरदारी म्हणून भाजपापाठोपाठ आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही सहलीवर रवाना झाले आहेत. काँग्रेसच्या पाच जणांचा रविवारी निर्णय होणार आहे.महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडणूक २८ डिसेंबरला होत आहे. ६८ पैकी शिवसेनेच्या सर्वाधिक २४ जागा निवडून आल्या असल्या तरी महापौरपदाच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी विद्यमान स्थायी समितीचे सभापती तथा नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी महापौरपदासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. वाकळे वगळता भाजपचे सर्वच्या सर्व १३ नगरसेवक सहलीवर आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेचे २४ नगरसेवक आणि एका अपक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ नगरसेवक शुक्रवारीच सहलीवर रवाना झाले.महापौर निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस बुधवारी (दि.२६) अधिकृतपणे जाहीर करणार आहे, तर काँग्रेसचा निर्णय रविवारी (दि.२३) होणार आहे. शिवसेनेने सर्वात आधी महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यानुसार विद्यमानविरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी जुळवाजुळव सुरू केलीआहे.भाजप तिसऱ्या स्थानी असला तरी भाजपाशिवाय कोणालाही सत्ता स्थापन करणे शक्य नाही. त्यामुळे भाजपानेच महापौरपदासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. महापौर निवडणुकीत नेमके कोणासोबत जायचे, याचा निर्णय रविवारी डॉ. सुजय विखे हे घेणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये फूट पडली, काँग्रेसचे दोन नगरसेवक सेनेसोबत, तर दोन भाजपसोबत जाणार असल्याच्या केवळ अफवा आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. काँग्रेसच्या पाचही नगरसेविका एकत्र आहेत. महापौर निवडणुकीत नेमकी भूमिका काय घ्यायची, याबाबत रविवारी (दि.२३) होणा-या बैठकीत निर्णय होईल. डॉ. सुजय विखे यांनी दिलेला निर्णय सर्वांना मान्य असेल.- सुप्रिया जाधव, गटनेत्या, काँग्रेस

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAhmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूक