शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिका आयुक्तांनी सोडला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:18 IST

महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली होवूनही रुजू न झाल्याने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त घनश्याम मंगळे यांना रुजू न झाल्यास कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे मंगळे यांनी तातडीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार सोपवून बुधवारी ते रवाना झाले.

ठळक मुद्देशासनाच्या आदेशाने मंगळे रवाना नव्या आयुक्तांचे तळ््यात-मळ््यात

अहमदनगर : महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली होवूनही रुजू न झाल्याने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त घनश्याम मंगळे यांना रुजू न झाल्यास कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे मंगळे यांनी तातडीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार सोपवून बुधवारी ते रवाना झाले.महापालिकेच्या आयुक्तपदी मंगळे हे आॅगस्ट २०१७ मध्ये रुजू झाले होते. वर्ष होण्याच्या आतच त्यांची बदली झाली. मंगळे यांची महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी १३ एप्रिल रोजी बदली झाली. मात्र त्याचवेळी द्विवेदी हे नव्यानेच जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यामुळे मंगळे यांचा कार्यभार घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला होता. २७ एप्रिल रोजी आयुक्तांनी त्यांचा पदभार जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवावा, असे शासनाने आदेश दिला होता. मात्र जिल्हाधिकारी व्यस्त असल्याने मंगळे यांना पदभार सोपविण्यास अडचणी आल्या. मंगळवारी (दि. ८) सायंकाळी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे पत्र आयुक्तांना मिळाले. ९ मे रोजी महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार न घेतल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराच पत्रात दिला होता. पत्र मिळताच आयुक्तांनी सायंकाळीच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र तेथे तहसीलदारांची बैठक सुरू असल्याने आयुक्तांना रात्री आठपर्यंत ताटकळत राहावे लागले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी प्रक्रिया पूर्ण करून आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. बुधवारी मध्यान्हपूर्व काळात मंगळे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार सोडला आणि ते लगेच मुंबईला रवाना झाले.आर्दड ‘स्वीच आॅफ’औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ आर्दड यांची महापालिका आयुक्त म्हणून नगरला बदली झाली होती. मात्र त्यांनी पहिल्यापासूनच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ आहे. त्यामुळे आर्दड हे नगरला येण्याची शक्यता कमीच आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडेच किमान महिनाभर तरी पदभार राहण्याची शक्यता महापालिका वतुर्ळात व्यक्त झाली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका