शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजपच्या ‘सुजय’ यांचा ‘विजय’ निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 18:44 IST

Ahmednagar Lok Sabha Election Results 2019

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे यांनी यांनी अखेरच्या फेरीपर्यत 2 लाख 74 हजार मतांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला असून अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना हार पत्करावी लागली.सुरुवातीपासूनच भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. मतांच्या आघाडीेची आगेकूच विखे यांनी सुरुच ठेवली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून अहमदनगर येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळात मतमोेजणीला सुरुवात झाली.डॉ.सुजय विखे यांना 6 लाख 88 हजार मते मिळाली तर त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना 4 लाख 14 हजार 423 मते मिळाली. ताज्या आकडेवारीनुसार विखे यांनी २ लाख ७७ हजारांचे लीड मिळाले आहे. सर्वच मतदारसंघातून विखे यांना लीड मिळाली आहे. सवार्धिक लीड राहुरी मतदारसंघातून मिळाले.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५४ हजार २४८ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.२६ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांना ६ लाख ३ हजार ९७६ मतांसह विजय साकारला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिवगंत राजीव राजळे यांना ३ लाख ९५ हजार ५६९ मतं मिळाली होती.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. सर्वा धिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले आहे. शेवगावमध्ये ६३.४० टक्के, राहुरी ६६.७७ टक्के, पारनेर ६६.१० टक्के, अहमदनगर शहर ६०.२५ टक्के, श्रीगोंदा ६४.७५ तर कर्जत-जामखेडमध्ये ६४.१० टक्के मतदान झाले.

ही पाहा आकडेवारी

विधानसभाडॉ.सुजय विखे (BJP)आ.संग्राम जगताप(NCP)विखे यांचे लीड
कर्जत-जामखेड1,02,34178,21524,126
श्रीगोंदा1,09,10978,51130,598
नगर शहर1,08,86055,73853,122
पारनेर1,17,08180,37236,707
राहुरी1,23,41753,50169,916
शेवगाव-पाथर्डी1,27,70068,08659,614
एकूण 6,88,5084,14,4232,74,085

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर