शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: पंतप्रधान मोदींच्या महात्सुनामीमुळे काँग्रेसचा सुपडा साफ : दिलीप गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 17:48 IST

Ahmednagar Lok Sabha Election Results 2019

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीसह एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी हा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जे गरीबांना समर्पित होऊन योजना राबविल्या. देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. हे जनतेला भावले आहे. आजच्या निकालाने संपूर्ण भारतात नरेंद्र मोदींची महासुत्नामीची मोठी लाट आली असून, या लाटेत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा सुपडासाफ झाला आहे. काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपद मिळेल की नाही, याची शंका निर्माण झाली आहे. नगरमध्येही जनतेने सर्व जाती-पातीच्या भिंती तोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली असल्याने नगर व शिर्डीच्या दोन्ही जागा युतीकडेच राहिल्या आहेत. डॉ.सुजय विखे व सदाशिव लोखंडे हे लाखाचा अंतराने विजयी घोषित होतील, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदारदिलीप गांधी यांनी केले.गांधी म्हणाले, संपूर्ण भारतात लोकसभेचे निकाल जाहीर झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची बहुमताकडे घोडदौड करत 300 हून अधिक जागा जिंकत आहेत. राज्यातही मोठे यश युतीला मिळाले आहे. या विजयाचा जल्लोष आज दुपारी शहर भारतीय जनता पार्टी कार्यालयात करण्यात आला. भाजप कार्यालयात सकाळपासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. जस-जसे निकाल समजत होते, तस-तशी कार्यकर्त्यांमधील उत्सुकता वाढतच होती. शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. लक्ष्मी कारंजा चौकात फटाके वाजवून व लाडू वाटून हा विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.यावेळी उपमहापौर मालन ढोणे, सरचिटणीस किशोर बोरा, सुनिल रामदासी, मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, गीतांजली काळे, श्रीकांत साठे, नाना भोरे, अन्वर खान, शुभांगी ठाकूर, नुतन कांबळे, संगीता मुळे, लिला अगरवाल, नंदा कुसळकर, सुरेख खरपुडे, सुनिल पंडित, चेतन जग्गी, संजय ढोणे, तुषार पोटे, भरत सुरतवाला, शशांक कुलकर्णी, अभिजित चिप्पा, अविनाश साखला, जालिंदर शिंदे, प्रशांत मुथा, कुमार दळवी, संतोष शिरसाठ, संदिप पवार, सुभाष साळवे, मंगेश भिडे, बबन गोसकी, राजेंद्र तापकिरे, अशोक भोसले, वसंत राठोड, अविनाश सोनवणे, गौतम बनसोडे, नितीन जोशी, पियुष जग्गी, नाथा देवतरसे, संजय सातपुते, राहुल रासकर, कुसूम शेलार, मनेष साठे, गौरव गुगळे, केदार लाहोटी, सुजित खरमाळे, मिलिंद भालसिंग, चंद्रकांत पाटोळे, मुकुंद पंत, मंगेश निसळ, सागर गोरे, राजू वाडेकर, नरेंश चव्हाण आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर