शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आम्ही नगरी, भाषणात नंबरी : धुळवड सभा

By सुधीर लंके | Updated: March 21, 2019 11:05 IST

मावळ प्रांतात साक्षात पार्थ दादाचे भाषण पडले. राज ठाकरे यांनी तर थेट मोदींच्या भाषणाची नक्कल करत खिल्ली उडवली

सुधीर लंके 

अहमदनगर : मावळ प्रांतात साक्षात पार्थ दादाचे भाषण पडले. राज ठाकरे यांनी तर थेट मोदींच्या भाषणाची नक्कल करत खिल्ली उडवली. भाषणांची एवढी सोशल ‘टिंगल’ होऊ लागल्याने राज्यातील सगळेच नेते हल्ली चिंतेत आहेत. ती चिंता इकडे नगरच्या नेत्यांतही पसरली आहे म्हणे ! नेत्यांची ही चिंता ओळखून ‘बुºहानगरकर’ आमदार शिवाजी कर्डिले यांनी धुळवडीच्या निमित्ताने जिल्ह्यातील नेत्यांची भाषणांची एक कार्यशाळाच बोलावली. कार्यशाळेचा विषय होता, ‘काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही’. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान सर्वात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याकडे होते.कर्डिले साहेबांचा निरोप आहे म्हटल्यावर सगळ्याच पक्षांचे आमदार, खासदार व बडे नेते झाडून हजर झाले. कार्यशाळेची सुरुवात अर्थातच कर्डिले यांच्या प्रास्ताविकपर भाषणाने झाली. ते म्हणाले, ‘तुम्हाला सांगतो...त्याच्यामधी त्याठिकाणी मी एवढी भाषणं केली. पण, आपलं भाषण कधी पार्थ दादासारखं आपटलं नाही. त्याठिकाणी लिहून भाषण करण्याची वेळ आपल्यावर कधी आली नाही. तशी वेळ तुमच्या कोणावरही येऊ नये म्हणून त्याच्यामधी त्याठिकाणी ही कार्यशाळा आयोजित करण्याचं मी ठरवलं. त्याठिकाणी तुम्हाला सांगतो.... (टिपेचा सूर)तुम्ही सगळे भाषणात काहीही बोला. पण, फक्त लिहून भाषणं करु नका. नाहीतर ‘चुकामुका’ होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुजयदादाला (सुजय यांच्याकडे नजर टाकत) मी खास करुन सांगतो, की स्टेजवर जातानाच भाजपाचा तीनदा जप करा. कारण त्याच्यामधी त्याठिकाणी तुम्ही इतके पक्ष चाचपडले की चिन्ह विसरण्याचा घोटाळा होऊ शकतो (हशा). माझाही कधीकधी तो होतो (पुन्हा हशा). म्हणून त्याठिकाणी माईकवरच कमळाचं चिन्ह लावायला सांगत जा. म्हणजे पक्ष इसरायचं कामच नाही. त्याठिकाणी मी जरी भाजपात असलो तर तुम्हा सगळ्यांची चिंता मलाच असल्याने मुद्दामहून ही कार्यशाळा बोलावली. शेवटी कर्डिलेंनाच सगळे पक्ष चालवावे लागतात (हशा). फडणवीसांनी चुकून मला विधानसभेचं अध्यक्ष केलं असतं तर आपल्यासारखं सभागृह कुणीच चालवलं नसतं (हशा). आपलं भाषण संपविताना मुरके मुरके हसत त्यांनी सुजय विखेंना टाळी दिली व खाली बसले. (कर्डिले यांचे भाषण सुरु असताना गडाखही गालातल्या गालात हसत काहीतरी टिपणं घेत होते).कर्डिले यांच्या प्रास्ताविकानंतर त्यांचे जावई आमदार संग्राम जगताप भाषणाला उभे राहिले. अत्यंत गंभीर चेहरा करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘याठिकाणी कर्डिले साहेब आत्ताच बोलले. येथे जमलेल्या सर्वांना सांगू इच्छितो की कर्डिले साहेबांच्या अपेक्षांना त्याठिकाणी अजिबातही तडा जाऊ देणार नाही. शेवटी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आम्हाला सांगितले आहे की त्याठिकाणी तुम्ही वडिलधाऱ्यांचा मान ठेवा. त्यामुळे कर्डिले साहेब भाजपात असले तरी त्यांचे सतत मार्गदर्शन घेत राहू. जनतेचं काम करण्याचं काम आही सातत्यानं करतो. त्यामुळे त्याठिकाणी भाषणं करावी लागतात. आमच्या भाषणांत ‘त्याठिकाणी’ जी सुधारणा झाली त्यात कर्डिले साहेबांचा मोठा वाटा आहे. होळीच्या बोंबा चालतात. पण लोकसभा निवडणुकीत भाषणाची बोंब व्हायला नको म्हणून त्याठिकाणी ही कार्यशाळा खूप उपयुक्त ठरेल. जय हिंद. जय महाराष्ट्र.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना कुठेतरी जाण्याची घाई होती. सर्वांना हात जोडत त्यांनी अगोदर बोलण्याची परवानगी मागितली. जय हरी म्हणून भाषण सुरु केले- ‘खूप सुंदर कार्यशाळा आहे. (गडाखांकडे तिरपा कटाक्ष टाकत) घराणेशाहीत फक्त नेत्यांच्याच मुलांना भाषणे येतात असे नाही. माझ्यासारख्या माणसालाही आता भाषणे येतात. या निमित्ताने मला खूप आनंद झाला की स्वाभिमानाने राजकारण करणारे कर्डिले साहेब यांनी ही कार्यशाळा घेतली. यानिमित्ताने मी एक सांगतो की मी स्वाभिमानाने भाषण करत आलो व स्वाभिमानाने करत राहिल. स्वाभिमानाने सरकारकडून निधी आणत राहिल.पुढचा नंबर राहुल जगतापांचा होता- ‘खरतर या ठिकाणी सुंदर कार्यशाळा होतेय. तुम्हाला सांगितलं पाहिजे की त्या ठिकाणी पवार साहेबांनी आम्हाला नेहमी सांगितलं की आपले लोकं हे अभ्यासू हवेत. अभ्यासू भाषणे करा. त्याठिकाणी आम्ही नेहमी लोकांमध्ये वावरतो. तुम्हाला सांगतो की सतत सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार आम्ही भाषणातून मांडत राहू. बबनदादा बोलतात एक आणि करतात दुसरे. पण त्याठिकाणी आम्ही तसं कधी करत नाही. आम्ही बोलू तेच वागू.’जगताप खाली बसताच वैभव पिचड भाषणाला उठले. ‘आदरणीय पिचड साहेब आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. याठिकाणी आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. त्याच भूमिकेतून याठिकाणी आदरणीय कर्डिले साहेबांनी ही जी कार्यशाळा घेतली त्याचा आनंद आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की यातून भाषणाची एक चळवळ जिल्ह्यात वाढायला मदत होईल. यामाध्यमातून राष्टÑवादी काँग्रेस पक्षावरचा विश्वास वाढीला लागेल. याठिकाणी मी या कार्यशाळेला शुभेच्छा देतो.आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाषणात शंकरराव कोल्हे, बिपीनदादा कोल्हे यांचा वारंवार उल्लेख करत ही कार्यशाळा कशी उपयुक्त आहे हे सांगितले. मोनिका राजळे यांनी भाषणात कोणत्याही नेत्याचा उल्लेख न करता पक्षाला व आपल्यालाही ही कार्यशाळा उपयुक्त असल्याचे सांगितले.आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर भाषणाची वेळ आल्यावर ते बराच काळ बोलू की नको या बुचकळ्यात होते. त्यांनी विखे-थोरात दोघांकडेही बघितले. पण, काहीच इशारा येईना. त्यामुळे ते अखेर उठले. ‘मला एकच वाक्य सांगायचे आहे. की आपल्या भाषणांमुळे संघर्ष व्हायला नको म्हणून न बोललेलं अधिक चांगलं असतं. आपण श्रद्धा आणि सबुरी ठेऊ. तेवढं केलं ्रकी प्रश्न येत नाही. आणि म्हणून ही कार्यशाळा सगळ्यांच्या दृष्टीने उपेगाची ठरणार आहे.’सुजय विखे असल्याने राधाकृष्ण विखे यांनी भाषणच न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना खूप आग्रह झाला. पण, ‘आपण नगर जिल्ह्यात बोलायचे नाही असे ठरविले असल्याने येथेही बोलणार नाही. आता भाषणच बंद’ एवढेच ते म्हणाले.पुढे अर्थातच सुजय विखे बोलायला लागले. ते म्हणाले, ‘कर्डिले साहेबांनी मला चिन्ह लक्षात ठेवायला सांगितले. पण, एक सांगतो विखे कुटुंबाला चिन्हाची चिंता कधी नव्हती. पुढेही राहणार नाही. भाषण तर आम्हाला कधीच चिंतेचा विषय नव्हता. पद्मश्रींपासून आम्ही लोकांमध्ये आहोत. आता गप्प बसायचे ठरविले व मौन धारण केले तरी लोक आमच्याभोवती जमतील. लोकचं बोलायला लावतील. त्यामुळे भाषण करुनच सर्व काही होईल असे नाही. माझ्या वडिलांनी आता भाषणच न करण्याचे ठरविले आहे. अर्थात त्यांचा निर्णय तो त्यांचा आहे. माझा, माझा (हशा). पण, कर्डिले साहेब इतके भारी आहेत की विखे परिवाराच्या मनात काय आहे हे ते ओळखतात.निवडणुकीत माझ्या बोलण्यामुळे घोटाळा नको म्हणून आमच्यावतीने इथून पुढे कर्डिले साहेबच भाषणे करतील. विखे परिवाराने भाषणांची रॉयल्टी आता कर्डिले साहेबांकडे देण्याचे ठरविले आहे’ (हशा). सुजय यांच्या या वाक्यावर खळखळून हसत कर्डिले यांनी शेजारी बसलेल्या विजय औटी यांच्यासह तीन-चार जणांना टाळ्या दिल्या. त्यामुळे इतरांचे हात दुखायला लागले. या भाषणाच्या वेळी बाळासाहेब थोरात गालातल्या गालात हसल्यासारखे करत होते.पुढचा नंबर अर्थात त्यांचाच होता. त्यांनी अचूकपणे लोणी-संगमनेर संदर्भ काढला. ते म्हणाले, ‘तुम्हाला सांगतो माणसाने नेमकेपणे बोलले पाहिजे. (कर्डिले यांच्याकडे कटाक्ष टाकत) आणि गैरसोय पाहून गप्पही बसायला नको. प्रश्नातील खोच लक्षात आल्याने लगेच कर्डिले म्हणाले ‘मी काही कुणाला भाषण बंदी केलेली नाही बरकां’. थोरात एवढ्यावर थांबले नाही. पुढे म्हणाले, ‘भाषणात वडिलधाऱ्यांचा मान ठेवायचा असतो ही संगमनेरची संस्कृती आहे. तसे नाही केले की घोटाळा होतो. (कर्डिले यांच्याकडे पाहत) काय कर्डिले साहेब?.कर्डिले पुन्हा खळखळून हसत, ‘तुम्ही मला का सांगताय सगळं’.औटींच्या अगोदर पालकमंत्री राम शिंदे यांचे भाषण होते. कुठल्याही कार्यक्रमात औटी आता शिष्टाचार मोडू देत नाहीत. राम शिंदे म्हणाले, ‘ंआम्ही फोर्टीप्लसचा नारा दिला. पण, लोकांनी आमचाच कार्यक्रम केला. आता काय करावा. आता तर तिकाडचे इकडं आलेत. त्यांनी पक्ष बदलला, आता आम्ही आमची भाषण बदलतो. कर्डिले साहेबांनी आमचा पुरता कार्यक्रम लावला आहे. आमच्या लोकांना (भाजपच्या) सांगत होतो, सावध रहा. पण, ऐकलं नाही. पण, कुणीही पक्षात आले तरी या राम शिंदेला चिंता नाही. आता आम्हीही मोठे झालो आहोत. आपले कनेक्शन थेट वरती आहे. माझे मंत्रिपद ठरलेले आहे. कर्डिले साहेब तुमचे पहा.’ (हसत हसत कर्डिले म्हणाले, अजून विधानसभा लांब आहे. तोवर कोण कुठं जातय काय सांगता).शेवटी गडाख यांचेच भाषण उरले होते. त्यांनी टिपणं समोर ठेवली. भाषण सुरु केले-‘व्यासपीठावर उपस्थित... (दीर्घ विराम)’. (खालून कर्डिले पुटपुटले. लवकर बोला नाहीतर निवडणूक संपून जाईल.) त्यावर गडाखही खळखळून हसले. गडाख यांनी भाषणात

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर