शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

अहमदनगर जिल्हा बँक भरती : उत्तरपत्रिकांच्या संशयास्पद कार्बन कॉपी तपासल्याच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:37 IST

जिल्हा सहकारी बँक भरतीत काही उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपीत संशयास्पद निळे डाग आढळून आले आहेत, असा निष्कर्ष सहकार विभागाच्या चौकशी समितीने काढला होता. फेरचौकशीत मात्र दिगंबर हौसारे यांच्या समितीने या गंभीर मुद्याकडे दुर्लक्ष करत या कार्बन कॉपी न तपासताच भरतीला ‘क्लिन चीट’ दिली. 

सुधीर लंके । अहमदनगर :  जिल्हा सहकारी बँक भरतीत काही उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपीत संशयास्पद निळे डाग आढळून आले आहेत, असा निष्कर्ष सहकार विभागाच्या चौकशी समितीने काढला होता. फेरचौकशीत मात्र दिगंबर हौसारे यांच्या समितीने या गंभीर मुद्याकडे दुर्लक्ष करत या कार्बन कॉपी न तपासताच भरतीला ‘क्लिन चीट’ दिली. नगर जिल्हा बँकेच्या ४६५ जागांच्या भरतीत अनियमितता होत असल्याचा संशय ‘लोकमत’ने व्यक्त केल्यानंतर सहकार विभागाने राम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करत भरतीची चौकशी केली. या समितीने लेखी परीक्षेत उत्तरपत्रिकांमध्ये अनियमितपणे फेरफार झाल्याचा आक्षेप नोंदविला होता. समितीने मूळ उत्तरपत्रिका व उमेदवारांच्या ताब्यात असलेली उत्तरपत्रिकांची कार्बन कॉपी याची तपासणी केली. ज्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांबाबत समितीला संशय होता त्या सर्वच उमेदवारांनी कार्बन कॉपी चौकशीसाठी सादर केली नाही. मात्र, ज्या उमेदवारांनी कार्बन कॉपी सादर केली त्यावर संशयास्पद पद्धतीने निळे डाग आढळले. मूळ कार्बन कॉपीवर परीक्षेनंतर कार्बन पेपर सदृश वस्तूने फेरफार करण्यात आला, असा संशय समितीने व्यक्त केला होता.उत्तरपत्रिका परीक्षा हॉलमधून सिलबंद केल्यानंतर उत्तरपत्रिकांच्या तपासणीच्या कोणत्याही प्रक्रियेचे बँकेने अथवा भरतीचे काम करणा-या ‘नाबयर’ संस्थेने चित्रीकरण केलेले नाही. त्यामुळे अनियमितता शोधण्यासाठी समितीने मूळ उत्तरपत्रिका व कार्बन कॉपी तपासून निष्कर्ष काढले होते. भरतीचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने संशयित ६४ उमेदवारांच्या भरती प्रक्रियेची फेरचौकशी करण्याचा आदेश दिला. या फेरचौकशीत उत्तरपत्रिकांच्या आक्षेपार्ह कार्बन कॉपीही तपासल्या जाणे आवश्यक होते. मात्र, चौकशीसाठी नियुक्त समितीने फॉरेन्सिक तज्ज्ञ जयंत आहेर यांच्यामार्फत केवळ मूळ उत्तरपत्रिका तपासल्या. आहेर यांनी मूळ उत्तरपत्रिकांत उमेदवारांनी जे उत्तरांचे गोल केले आहेत त्यांची रंगछटा ही काळी असल्याचा दोन ओळीचा अहवाल दिलेला आहे. या अहवालाचा आधार घेत हौसारे  यांची समिती व विभागीय  सहनिबंधक यांनी सर्व भरतीला क्लिन चिट दिली. परीक्षा घेणा-या संस्थेने उत्तरपत्रिका विलंबाने का स्कॅन केल्या? उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण व व्हिडीओ चित्रीकरण का केले नाही? नायबर संस्थेने बँकेला कल्पना न देताच भरतीत इतर संस्थांची मदत कशी घेतली? हे मुद्दे फेरचौकशी समितीने पूर्णत: दुर्लक्षित केलेले दिसतात. फॉरेन्सिक तज्ज्ञाची नियुक्ती करतानाही शासकीय संस्थेकडे हे काम देण्यात आले नाही.  फेरचौकशी समिती म्हणते कार्बन कॉपी आम्हाला मिळाल्या नाहीत फेरचौकशी समितीकडे उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपी तपासणीसाठी देण्यात आल्या नव्हत्या. मूळ उत्तरपत्रिका तपासल्याने कार्बन कॉपीची तपासणी करणे आवश्यक वाटले नाही, असे फेरचौकशी समितीचे प्रमुख दिगंबर हौसारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांत फेरफार झाल्याने कार्बन कॉपीतही तसे फेरफार केले गेले. पहिल्या समितीने त्याआधारेच अनियमितता सिद्ध केली आहे. याकडे लक्ष वेधले असता उमेदवारांच्या कार्बन कॉपी आम्हाला मिळाल्या नाहीत, असे हौसारे म्हणाले. पहिल्या समितीला या कार्बन कॉपी उपलब्ध झाल्या. मग, फेरचौकशी समितीला का मिळाल्या नाहीत? असा मुद्दा आता उपस्थित होत आहे. 

आपणाकडे तपासणीसाठी केवळ मूळ उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यात जे गोल काळे करण्यात आले त्याची छटा आपण तपासली. उत्तरपत्रिकांची कार्बन कॉपी तपासणीसाठी देण्यात आली नव्हती. तपासलेल्या उत्तरपत्रिकांत एक उदाहरण असे आढळले की परीक्षा एका व्यक्तीने दिली व त्याच्या जागेवर मुलाखत दुस-या व्यक्तीने दिली, असे सेवानिवृत्ती दस्तावेजांचे राज्य परीक्षक जयंत आहेर यांनी सांगितले.       

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्रjobनोकरीfraudधोकेबाजीinterviewमुलाखत