शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अहमदनगर जिल्हा बँकेला ३३ कोटींचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 17:24 IST

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ३१ मार्च २०१७ अखेर संपलेल्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३३ कोटी २० लाख ३९ हजार १३७ रूपये १३ पैशांचा नफा झाला आहे. त्यातून सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी गुरूवारी बँकेच्या ६० व्या वार्षिक सभेत केली.

ठळक मुद्देवार्षिक सभेत घोषणासभासदांना ९ टक्के लाभांश

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ३१ मार्च २०१७ अखेर संपलेल्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३३ कोटी २० लाख ३९ हजार १३७ रूपये १३ पैशांचा नफा झाला आहे. त्यातून सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी गुरूवारी बँकेच्या ६० व्या वार्षिक सभेत केली.गायकर यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या अधिमंडळाची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार सभागृहात झाली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी प्रास्ताविक केले. सन २०१५-१६ च्या तुलनेत २०१६-१७ मध्ये स्वभांडवल, ठेवी, बाहेरील कर्जे, दिलेली कर्जे, नफा व खेळते भांडवल या सर्वच आर्थिक स्थितीत वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये बँकेचे स्वभांडवल ७३९ कोटी ८९ लाख रुपये, ठेवी ५ हजार २४८ कोटी ३९ लाख रुपये, बाहेरील कर्ज १ हजार ६४ कोटी २ लाख रूपये, गुंतवणूक २ हजार ४८३ कोटी ४९ लाख रूपये, दिलेली कर्जे ४ हजार ५० कोटी १७ लाख रुपये व खेळते भांडवल ७ हजार ३५७  कोटी १५ लाख रूपयांवर पोहोचले आहे. २०१६-१७ मध्ये ३३ कोटी २० लाख रूपयांचा नफा झाला असून भागधारकांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. त्यासाठी १८ कोटी २९ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.  ३१ मार्च २०१७ अखेर सर्व प्रकारच्या कर्ज वाटपापैकी ४०५०.१७ कोटी रुपयांची कर्ज येणे बाकी असल्याचे गायकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. मायक्रो एटीएम केंद्रबँकेने २०१७-१८ मध्ये ग्राहकांना रूपे डेबिट व किसान क्रेडिट कार्ड देऊन बँकेचे स्वत:चे एटीएम कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाभरात २० एटीएम केंद्र सुरू करण्यात आली आहेत. बँकेच्या शाखा व सेवा संस्थांच्या कार्यालयांमध्ये मायक्रो एटीएम बसवून शेतकरी सभासदांना रूपे किसान क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याची सुविधा पुरविली जाणार आहे. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आ.शिवाजी कर्डिले, आ.वैभव पिचड, दत्तात्रय पानसरे, पांडुरंग अभंग, बाजीराव खेमनर, चंद्रशेखर घुले, जयंत ससाणे आदी संचालक हजर होते. तर आमदार अरूण जगताप, यशवंतराव गडाख,माजी आमदार राजीव राजळे, बिपीन कोल्हे, अरूण तनपुरे, राजेंद्र नागवडे हे संचालक गैरहजर होते. उपाध्यक्ष रामदास वाघ यांनी आभार मानले.