शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत कपात केलेले ८५ कोटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 20:18 IST

अहमदनगर : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत केलेली कपात शासनाने सोमवारी उठली असून, जिल्ह्याला ३० टक्क्यांप्रमाणे ८५ कोटींचा निधी मिळणार आहे. तसा आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला.

अहमदनगर : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत केलेली कपात शासनाने सोमवारी उठली असून, जिल्ह्याला ३० टक्क्यांप्रमाणे ८५ कोटींचा निधी मिळणार आहे. तसा आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. नव्याने प्राप्त होणा-या निधीच्या नियोजनासाठी मंगळवारी जिल्हानियोजन भवनात सर्व यंत्रणांची बैठक बोलाविण्यात आली आहे.चालू अर्थिक वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्याला ३५१ कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र शासनाने मध्यंतरी सर्व शासकीय योजनांच्या निधीत ३० टक्क्यांची कपात केली होती. त्यामुळे चालूवर्षीच्या मंजूर आराखड्यापैकी २७६ कोटी (७० टक्के) निधी सर्व यंत्रणांना वितरित करण्यात आला. प्राप्त झालेल्या निधीनुसार जिल्हा परिषदेसह अन्य शासकीय यंत्रणांनी कामाचे नियोजन केले़ आर्थिक वर्षे मार्चमध्ये संपते. त्यामुळे प्राप्त झालेला निधी खर्च करण्याचे नियोजन सर्व यंत्रणांनी केले. परंतु, सर्वच यंत्रणांना त्यांना मंजूर असलेल्या मूळ रकमेनुसार निधी दिला जाणार आहे. शासकीय यंत्रणा मंजूर निधीच्या दीडपट खर्चाची कामे सुचवित असतात. शासनाने निधीची कपात उठविल्यामुळे दीडपटीतील कामेही मार्गी लागतील. मार्चअखेरीस हा निधी खर्च करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नव्याने प्राप्त होणा-या निधीचे नियोजन करून कामांना प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे.जिल्हा नियोजन समितीची गेल्या जानेवारीमध्ये झालेल्या सभेत वार्षिक योजनेच्या निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला़ शासनाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्याला २७६ कोटींचा निधी वितरित केलेला आहे़ त्यापैकी सर्व शासकीय यंत्रणांनी १८९ कोटी खर्च केले़ उर्वरित निधी अखर्चित होता़ त्यात आता नव्याने ८५ कोटींचा निधी विकासकामांसाठी उपलब्ध होणार असल्याने सर्वच कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ४० कोटींची भर

विविध शासकीय योजनेंतर्गत जिल्हा परिषदेला चालू आर्थिक वर्षांत १६१ कोटी रुपये मंजूर झाले होते़ मात्र शासनाने ३० टक्के कपात केली. त्यामुळे मंजूर निधीपैकी जिल्हा परिषदेला १२१ कोटी निधी मिळाला़ जिल्हा परिषदेने प्राप्त निधीतून दीडपट कामे सूचविली होती़ ही कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना कपात केलेले ३० टक्क्यांप्रमाणे जिल्हा परिषदेला सुमारे ४० कोटींचा निधी मिळणार आहे़ हा निधी येत्या मार्चअखेरीस खर्च करणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय