शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरच्या 'माईक'सह 'ड्रायव्हर' पुरुषोत्तममध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 12:38 IST

अहमदनगर : महाराष्ट्रातील मानाच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा बिगूल वाजला असून अंतिम फेरीसाठी राज्यभरातील ९ एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगरमधील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाची माईक आणि पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ड्रायव्हर या दोन एकांकिकांनी अंतिम फेरीत एन्ट्री केली आहे. 

ठळक मुद्देअंतिम फेरीसाठी ९ एकांकीका पात्र माईक - न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगरड्रायव्हर - पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर 

अहमदनगर : महाराष्ट्रातील मानाच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा बिगूल वाजला असून अंतिम फेरीसाठी राज्यभरातील ९ एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगरमधील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाची माईक आणि पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ड्रायव्हर या दोन एकांकिकांनी अंतिम फेरीत एन्ट्री केली आहे. 

८ ते २३ आॅगस्ट दरम्यान पुरुषोत्तमच्या प्राथमिक फेरीचा आवाज घुमला. प्राथमिक फेरीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यामधून सर्वोत्कृष्ट नऊ संघाची निवड अंतिम फेरीकरिता करण्यात आली. त्यामध्ये अहमदनगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयाची ड्रायव्हर, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाची माईक, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या आफ्टर द डायरी, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या भेट, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या मुकुंद कोणी हा पाहिला, मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ए एस एल प्लिज, काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या साने आणि कंपनी, बीएमसीसी महाविद्यालयाच्या सॉरी परांजपे आणि सर परशूराम भाऊ महाविद्यालयाच्या भूमिका या एकांकिकेंचा समावेश आहे. अंतिम फेरी ९ आणि १० संप्टेबर रोजी पार पडणार आहे. माईक एकांकिका न्यू आर्टस कॉमर्स  सायन्स महाविद्यालयाची निर्मिती आहे.  संदीप दंडवते लिखित व कृष्णा वाळके याने दिग्दर्शन केले आहे. त्यामध्ये कृष्णा वाळके, विराज अवचित्ते, ऋषभ कोन्डावार, संकेत जगदाळे, अमित रेखी, निखिल शिंदे, शुभम पोपळे, तंत्रज्ञ अमोल साळवे, प्रिया तेलतुंमडे यांनी काम केले आहे. संघाला प्रा. अनंत काळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ड्रायव्हर एकांकिका पेमराज सारडा महाविद्यालयाची निर्मिती आहे. नवोदित लेखक अमोल साळवे यांनी लेखन केले आहे.

अंतिम स्पधेर्तील एकांकिका - माईक - न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, अहमदनगरड्रायव्हर -प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगरआफ्टर द डायरी - आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणेभेट - फर्ग्युसन महाविद्यालय,पुणेमुकुंद कोणी हा पाहिला - गरवारे वाणिज्य महाविद्यालय,पुणेए एस एल प्लिज - मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय , पुणेसाने आणि कंपनी - काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे सॉरी परांजपे - बीएमसीसी महाविद्यालय,पुणे भूमिका - सर परशूराम भाऊ महाविद्यालय,पुणे